काव्या मारन हिच्या चेहऱ्यावरचं दु:ख पाहून रजनीकांत याने उचललं असं पाऊल, वडिलांना स्पष्टच म्हणाले की…
आयपीएल 2023 स्पर्धेत सनराईजर्स हैदराबाद संघाची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यामुळे काव्या मारन हिला सामन्यादरम्यान उदास पाहिलं गेलं. त्यामुळे तिचा असा चेहरा पाहून रजनीकांतला प्रचंड दु:ख झालं आहे.

मुंबई : आयपीएल स्पर्धेत सनराईजर्स हैदराबादच्या नावावर एक जेतेपद आहे. असं असताना गेल्या दोन सिझनमध्ये सनराईजर्स हैदराबाद संघाची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. निराशाजनक कामगिरीमुळे चाहत्यांनी खेळाडूंवर टीकास्त्र सोडलं आहे. दुसरीकडे संघ मालक काव्या मारन हिच्या चेहऱ्यावरही ही कामगिरी पाहून दु:ख स्पष्ट दिसत आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान तिची स्थिती पाहिली गेली आहे. याबाबतचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. यात ती डोक्याला हात मारून बसल्याचं दिसत आहे. काव्याची अशी स्थिती पाहून सुपरस्टार रजनीकांतही अस्वस्थ झाले आहेत. याबाबत त्यांनी काव्याचे वडील कलानिधी मारन यांना फोन करून एक सल्ला दिला आहे. कलानिधी मारन हे सनराईजर्स हैदराबाद संघाचे मालक आणि फिल्म प्रोड्युसर आहेत.
काय म्हणाले सुपरस्टार रजनीकांत?
“काव्या मारन हीच्या वडिलांना इतका सल्ला देईल की, संघात चांगल्या खेळाडूंची निवड केली गेली पाहीजे. कारण काव्याचा उदास आणि दु:खी चेहरा पाहवत नाही. आयपीएलमध्ये तिला अशा स्थितीत पाहून वाईट वाटतं.” असा सल्ला सुपरस्टार रजनीकांत यांनी दिला आहे. चित्रपट जेलरच्या ऑडिओ लाँचिंगवेळी त्यांनी कलानिधी मारन यांना विनंती केली.
Rajnikanth : Kalanithi Maran should put good players in SRH team. I feel bad seeing Kavya Maran like that in TV ?#WhistlePodu #IPL #Rajinikanth pic.twitter.com/HNOzEOKP5R
— CSK Fans Army™ (@CSKFansArmy) July 28, 2023
आयपीएल 2023 स्पर्धेत काव्या मारन हीने 14 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला होता. एडन मार्करम यांच्या नेतृत्वात संघाची कामगिरी सुमार राहिली आहे. इतर संघांच्या आसपासही हैदराबादचा संघ नव्हता.
बदल करूनही नशिबाची साथ मिळाली नाही
हैदराबाद संघात असं नाही की, दिग्गज खेळाडूंचा भरणा नाही. पण मोक्याच्या क्षणी त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे संघात काही बदल करण्यात आले होते. मात्र असं करून संघाच्या कामगिरीवर फरक पडला नाही. हैदराबादने पहिल्यांदा डेव्हिड वॉर्नर आणि त्यानंतर केन विलियमसनला बाहेरचा रस्ता दाखवला. जॉनी बेयरस्टो आणि राशीद कान यांनाही हैदराबादने रिटेन केलं नव्हतं.
काव्या मारनला क्रिकेटची आवड
काव्या मारन हीचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईत झाला. 2019 मध्ये सन टीव्ही नेटवर्कच्या डायरेक्टर पॅनेलमध्ये सहभागी झाली. तिला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. आयपीएलच्या खेळाडूंच्या लिलावात तिची बोली लावण्याची पद्धत पाहिली गेली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या निवडीत तिची महत्त्वाची भूमिका असल्याचं अधोरेखित झालं आहे.
