Shahrukh Khan Video : हे असं शाहरुखच करु शकतो, KKR च्या विजयानंतर मैदानात एंट्री, सगळ्यांचच जिंकलं मन

IPL 2024 DC VS KKR : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सने 106 धावांनी मोठा विजय मिळवला. केकेआरचा मालक शाहरुख खान या विजयाचा साक्षीदार ठरला. KKR च्या विजयानंतर शाहरुखने मैदानात एंट्री केली. त्यानंतर जे झालं, त्याने सगळ्यांचच मन जिंकलं.

Shahrukh Khan Video : हे असं शाहरुखच करु शकतो, KKR च्या विजयानंतर मैदानात एंट्री, सगळ्यांचच जिंकलं मन
Shahrukh KhanImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 9:38 AM

IPL 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने कमाल केलीय. त्यांनी सलग तीन सामने जिंकलेत. पॉइंट टेबलमध्ये मध्ये KKR ची टीम टॉपवर आहे. आपल्या टीमच्या विजयी हॅट्ट्रीक नंतर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान खूप आनंदी आहे. दिल्ली विरुद्ध मोठा विजय मिळवल्यानंतर शाहरुख खान विशाखापट्टनमच्या मैदानावर उपस्थित होता. शाहरुख खानने आपल्या टीमच्या परफॉर्मन्सला सलाम केला. केकेआरच्या विजयानंतर शाहरुखने मैदानात जे केलं, त्याने अनेकांच मन जिंकलं. शाहरुख खान मॅच संपल्यानंतर मैदानात आला. शाहरुखने केकेआरच्या प्रत्येक खेळाडूला मिठी मारली.

कॅप्टन श्रेयस अय्यर, मेंटॉर गौतम गंभीर, रिंकू सिंह आणि तुफानी फलंदाजी करणाऱ्या अंगकृष रघुवंशीला त्याने विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शाहरुखने फक्त आपल्या टीमच्या खेळाडूंवर प्रेम व्यक्त केलं असं नाहीय, तो दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना सुद्धा भेटला. खासकरुन ऋषभ पंत बरोबर बराचवेळ बोलला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला. पण स्वत: ऋषभने कमालाची बॅटिंग केली. शाहरुखने म्हणून ऋषभच सुद्धा कौतुक केलं. 2022 च्या रस्ते अपघातानंतर ऋषभ पंतने आता क्रिकेट मैदानावर पुनरागमन केलय. त्याच्या बॅटमधून सुद्धा धावांचा पाऊस पडतोय.

त्याच्यामुळे केकेआर आज टॉपवर

या सीजनमध्ये केकेआरची टीम मजबूत दिसतेय. गौतम गंभीरच टीममध्ये पुनरागमन हे त्यामागे कारण आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने दोनवेळा आयपीएलच किताब जिंकलाय. आता तो मेंटॉर म्हणून टीमसोबत आहे. काही कारणांमुळे गंभीर केकेआरपासून लांब गेला होता. पण आता हा दिग्गज पुन्हा टीममध्ये आलाय. गंभीर टीममध्ये आला, त्यामध्ये शाहरुख खानची भूमिका महत्त्वाची आहे. गंभीरचा विचार आणि दूरदृष्टी याचा टीमला फायदा होतोय.

सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.