विराट कोहलीची ‘ही’ रणनीती चुकीची, दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नची टीका

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे सोडता इतर फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी झाले आहेत. ज्यामुळे भारतीय संघ 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावांवर पोहोचला आहे.

विराट कोहलीची 'ही' रणनीती चुकीची, दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नची टीका
शेन वॉर्न
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 12:38 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत खेळणाऱ्या भारतीय संघाने 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा जमवल्या आहेत. भारताकडे सध्या केवळ 153 धावांचीच आघाडी असल्याने विराटसह पुजारा, शर्मा या दिग्गजांवर टीकेची झुंबड उडाली आहे. अजिंक्य रहाणे (61) सोडता कोणत्याच भारतीय फलंदाजाने खास कामगिरी केलेली नाही. त्यात पहिल्या डावातही भारतीय गोलंजानी हवी तशी कामगिरी न केल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजाच्या हातातच सामना जिंकवण्याची सर्व जबाबदारी असणार आहे. अशावेळी दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्नने (Shane warne) विराटच्या रणनीतीवर प्रश्न उठवत अधिक फिरकीपटू न खेळवल्याच्या निर्णयावर टीका केली आहे.

शेन वॉर्नने एक ट्वीट केलं ज्यात त्याने लिहिलं आहे की, ”फिरकीपटू हे कधीही खेळ फिरवू शकतात. मैदानाची स्थिती कशीही असो फिरकीपटूंना खेळवने फायद्याचेच ठरते. केवळ पहिल्या डावाचा विचार करुन तुम्ही संघ निवड करणे चूकीचे आहे. फिरकीपटूचं सामना जिंकवू शकतात.” दरम्यान शेनच्या या ट्विटमुळे विराटने आश्विनला न खेळवण्याचा निर्णय चूकला असल्याचेच जणू त्याने सूचित केले आहे.

पंतचा खेळ पाहायला आवडतं-शेन वॉर्न

वरील ट्विटच्या काही वेळ आधीच शेनने एक ट्विट करत ऋषभ पंत हा त्याचा सध्याच्या काळातील आवडता फलंदाज असल्याचे त्याने सांगितले. पंतचा खेळ पाहायला आवडतं, आधुनिक क्रिकेटमधील तो माझा आवडता खेळाडू असल्याचं शेनने म्हटलं आहे. तसंच मला कसोटी क्रिकेट खूप आवडतं असंही शेनने ट्विटमध्ये लिहिलं आहे.

हे ही वाचा

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

IND vs ENG : रहाणेचं अर्धशतक, चौथ्या दिवसअखेर भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल, रिषभ पंतवर मदार

पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!

(Shane warne targets Virat Kohli on his team selection in india vs england second test)

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.