एमएस धोनी T20 WC संघात शार्दुल ठाकूरच्या समावेशासाठी कोहली-शास्त्रींसोबत चर्चा करेल : मायकल वॉन

यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यापासून, टी 20 विश्वचषक 2021 साठी भारताचा 15 सदस्यीय संघ चर्चेचा विषय आहे.

एमएस धोनी T20 WC संघात शार्दुल ठाकूरच्या समावेशासाठी कोहली-शास्त्रींसोबत चर्चा करेल :  मायकल वॉन
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Oct 06, 2021 | 1:52 PM

नवी दिल्ली : यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यापासून, टी 20 विश्वचषक 2021 साठी भारताचा 15 सदस्यीय संघ चर्चेचा विषय आहे. ईशान किशन, सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती हे खेळाडू ‘मेन इन ब्लू’ साठी त्यांच्या पहिल्या आयसीसी स्पर्धेत खेळताना दिसतील. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, संजू सॅमसन सारख्या इतर काही स्टार्सना या मोठ्या स्पर्धेच्या रोस्टरमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) 10 ऑक्टोबरपर्यंत अंतिम संघात काही बदल करू शकते, परंतु मंडळाने अद्याप असे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. (Shardul Thakur similar to Ian Botham, MS Dhoni will ask Virat Kohli, Ravi Shastri to Get him in T20 WC squad)

बीसीसीआयकडून विश्वचषक संघात कोणतेही बदल करण्याचे संकेत नसतानाही, चाहत्यांनी आणि तज्ज्ञांनी संभाव्य बदलांवर आपले मत मांडणे सुरू ठेवले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने शार्दुल ठाकूरचा टी – 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्याविषयी त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याला असे वाटते की, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) भारताचा कर्णधार विराट कोहली तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी देखील याबद्दल चर्चा करेल.

महेंद्रसिंग धोनी केवळ सीएसकेचा कर्णधारच नाही तर टी -20 विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) देखील आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईसाठी शार्दुलने काय केले, याकडे बारकाईने लक्ष दिल्यानंतर धोनी विश्वचषक संघात या वेगवान गोलंदाजाच्या समावेशाबद्दल कोहली आणि शास्त्री यांच्याशी बोलू शकतो, असे वॉनचे मत आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेला भारताचा संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन

राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकुर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

इतर बातम्या

T20 world Cup ला मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती मुकणार?, दुखापतीनंतरही आयपीएलमधून माघार नाहीच, काय आहे नेमकं प्रकरण?

T20 world Cup 2021 पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर IPL मध्ये दुखापतग्रस्त, विश्वचषकालाही मुकणार

उत्तम T20 क्रिकेटर व्हायचंय?, कोहली किंवा गेलला नाही तर ‘या’ खेळाडूला फॉलो करा, माजी इंग्लंड कर्णधाराचा युवांना सल्ला

(Shardul Thakur similar to Ian Botham, MS Dhoni will ask Virat Kohli, Ravi Shastri to Get him in T20 WC squad)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें