AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : आयपीएलमध्ये नवीन वादळ, शशांक सिंह कोण आहे? 6 फोर, 4 सिक्स, 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट

GT vs PBKS : आयपीएल 2024 च्या 17 व्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला 3 विकेटने हरवलं. पंजाबने 200 धावांच लक्ष्य एक चेंडू राखून पार केलं. टीमच्या विजयाचा हिरो ठरला शशांक सिंह. शशांक सिंहने 29 चेंडूत नाबाद 61 धावा करुन गुजरात टायटन्सच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला.

IPL 2024 : आयपीएलमध्ये नवीन वादळ, शशांक सिंह कोण आहे? 6 फोर, 4 सिक्स, 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट
shashank singh
| Updated on: Apr 05, 2024 | 10:24 AM
Share

6 फोर आणि 4 सिक्स, 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट आणि फक्त 29 चेंडूत कुटल्या नाबाद 61 धावा… हे आकडे त्या फलंदाजाचे आहेत, ज्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्सच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला. आम्ही बोलतोय शशांक सिंहबद्दल. जो पंजाबच्या विजयाचा खरा किंग ठरला. शशांक सिंहने आपल्या तुफानी बॅटिंगच्या बळावर पंजाब किंग्जला गुजरात टायटन्सवर 3 विकेटने विजय मिळवून दिला. पंजाबसमोर विजयासाठी 200 धावांच टार्गेट होतं. शशांकच्या हिटिंगमुळे पंजाबच्या टीमने 1 चेंडू राखून विजय मिळवला. या शानदार इनिगंसाठी शशांक सिंहला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. या इनिंगमुळे त्याच्या जुन्या टीमबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालय.

मॅच फिनिश करायची प्रॅक्टिस केली, त्यानंतर आज प्रत्यक्षात अमलबजावणी केल्यानंतर खूप आनंद होतोय असं शशांक सिंह म्हणाला. शशांक सिंह म्हणाला की, मी 7 व्या नंबरवर बॅटिंगला येतो. पण आज 5 व्या नंबरवर आलो. मला जास्त मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही, असं शशांकने सांगितलं. 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून शशांक सिंहला जास्त संधी मिळाली नाही. पण पंजाब किंग्सच्या मॅनेजमेंटने शशांकवर विश्वास दाखवला. शशांकने स्पष्टपणे सांगितलं की, “एक खेळाडू तेव्हाच परफॉर्म करु शकतो, जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेऊन संधी दिली जाईल”

‘मी गोलंदाजाच नाव नाही, त्याचा चेंडू बघतो’

शशांक सिंहने राशिद खान सारख्या गोलंदाजाची धुलाई केली. शशांकला या बद्दल विचारलं, तेव्हा तो म्हणाला की, ‘मी गोलंदाजाच नाव नाही, त्याचा चेंडू बघतो’ शशांकने गुजरात टायटन्स विरुद्ध हेच केलं. त्याने मिडल ऑर्डरमध्ये सिकंदर रजासोबत 22 चेंडूत 41 धावांची भागीदारी केली. जितेश शर्मासोबत 19 चेंडूत 39 धावांची पार्ट्नरशिप केली. आशुतोष शर्मासोबत 22 चेंडूत 43 धावा जोडल्या. या भागीदारीच्या बळावरच पंजाबने रोमांचक विजय मिळवला.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.