AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : श्रेयस अय्यर सूर्याची जागा घेणार;भारताचा कर्णधार बदलणार?

Shreyas Iyer and Surykumar Yadav: सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i टीम इंडियाने अद्याप एकही मालिका गमावलेली नाही. तसेच सूर्याने कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात भारताला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिलाय. मात्र सूर्याला फलंदाज म्हणून काही खास करता आलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार आहे.

Team India : श्रेयस अय्यर सूर्याची जागा घेणार;भारताचा कर्णधार बदलणार?
Suryakumar Yadav and Shreyas Iyer Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Apr 19, 2026 | 8:43 PM
Share

भारतात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची (IPL 2026) रंगत पाहायला मिळत आहे. प्रत्येक संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी लढत आहे. अशात आयपीएल दरम्यान टीम इंडियाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. टी 20i टीम इंडियाचा कॅप्टन बदलणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर हा कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादव याची जागा घेणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने टीम इंडियाचा टी 20i कर्णधाराबाबतचं वृत्त दिलं आहे. टीओआयनुसार, सूर्याच्या जागी श्रेयसला कॅप्टन करण्याबाबत चर्चा सुरु आहे.

टीम इंडियात हार्दिक पंड्या आणि इतर खेळाडूही आहेत ज्यांना नेतृत्वाचा तगडा अनुभव आहे. मात्र श्रेयसचंच नाव आघाडीवर असण्यामागे कारण आहे. त्याबाबत जाणून घेऊयात. श्रेयसने कॅप्टन म्हणून आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. श्रेयसने त्याच्या नेतेत्वात दिल्लीला 2020 साली अंतिम फेरीत पोहचवलं होतं. याच श्रेयसने केकेआरला 2024 साली आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती. तर श्रेयसच्या नेतृत्वात पंजाब किंग्स 2025 साली उपविजेता ठरली होती. इतकंच नाही, श्रेयसने नेतृत्वाच्या जबाबदारीसह फलंदाजीतही कमाल केली आहे. सध्या श्रेयस पंजाबचंच नेतृत्व करत आहे.

तसेच श्रेयसची आयपीएल स्पर्धेत यशस्वी कर्णधार म्हणून सर्वाधिक टक्केवारी आहे. कॅप्टन म्हणून श्रेयसची टक्केवारी ही 61 टक्के इतकी आहे. श्रेयस याबाबत महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मापेक्षाही सरस आहे.

टीओआयच्या रिपोर्ट्सनुसार, निवड समिती कॅप्टन बदलण्याच्या विचारात असल्यास ते श्रेयस अय्यर याचा विचार करु शकतात. तसेच निवड समिती श्रेयसचा चौथ्या स्थानी फलंदाजीसाठीही विचार करु शकतात. त्यामुळे सूर्याच्या जागेसाठी श्रेयस प्रबळ दावेदार आहे.

श्रेयस 3 वर्षांपासून टीममधून बाहेर

श्रेयस सध्या टी 20I टीम इंडियाचा भाग नाही. श्रेयसने अखेरचा टी 20I सामना 3 वर्षांआधी खेळला होता. श्रेयस 2023 साली टी 20I टीमचा भाग होता. त्यामुळे निवड समिती 3 वर्षांपासून बाहेर असलेल्या श्रेयसला संधी देणार की कर्णधार म्हणून पहिल्याच फेरीत टीम इंडियाला टी 20I वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या सूर्यकुमारवर विश्वास कायम ठेवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...