AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पंचांशी वाद घातल्यानंतर गिल खूश, लॉर्ड्सवर भारतीय कर्णधाराचा मूड अचानक का बदलला?

लॉर्ड्स कसोटी सामन्यात चेंडू बदलण्यावरून बराच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच काय तर कर्णधार गिलने पंचांशी वादही घातला. पण नंतर झालं असी की शुबमन गिल खूश दिसला. त्याचा मूड अचानक बदलण्याचं कारण काय?

IND vs ENG : पंचांशी वाद घातल्यानंतर गिल खूश, लॉर्ड्सवर भारतीय कर्णधाराचा मूड अचानक का बदलला?
IND vs ENG : पंचांशी वाद घातल्यानंतर गिल खूश, लॉर्ड्सवर भारतीय कर्णधाराचा मूड अचानक का बदलला?Image Credit source: PTI
| Updated on: Jul 11, 2025 | 8:11 PM
Share

अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मैदानावर बराच गोंधळ दिसला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात हा वाद पाहायला मिळाला. कारण ऐरव्ही शांत असणाऱ्या कर्णधार शुबमन गिलने रौद्र रूप धारण केलं होतं. त्याचं कारण ठरलं ते इंग्लंडच्या एकाच डावातील दोन सत्रात दोन वेळा चेंडू बदलण्याची वेळ आली. त्यामुळे गिलने पंचांशी वाद घातला. त्यानंतर त्याचा मूड बदलला आणि हसायला लागला. गिलचं असं वागणं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. असं नेमकं का झालं? कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात जो रूटच्या शतकाने झाली. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि 37वं शतक पूर्ण केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहची आक्रमक गोलंदाजीचं दर्शन घडलं. त्याने जो रूट आणि बेन स्टोक्ससह तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्यामुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत होती. त्यामुळे कर्णधार शुबमन गिलसह सर्वच खूश होते. मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने नाटकं सुरू झाली.

पहिल्यांदा पंचांसोबत वाद

वादाची पहिली ठिणगी 91 व्या षटकात पडली. जेव्हा टीम इंडियाने चेंडू बदलण्याची मागणी केली. पंच यासाठी तयार झाले होते आणि फक्त 10.3 षटकात चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला गेला. पण बदललेल्या चेंडूवर वाद झाला. कारण या आधीचा चेंडू खूप जूना असल्याचं भारतीय संघाचं म्हणणं होतं. त्यामुळे गिल खूपच वैतागलेला दिसला. त्याने पंचांच्या हातून चेंडू घेतला आणि रागाच्या भरात दिसला. बराच काळ त्याच्या चेहऱ्यावर राग होता आणि काही वेळानंतर पंचांशी वाद देखील घातला.

पण नंतर गिल खूश झाला

पहिलं सत्र संपताना गिलच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आणि हसताना दिसला. पण असं होण्याचं कारण काय होतं? कारण तिथपर्यंत विकेट काही मिळाली नव्हती. तसेच एक मोठी भागीदारी होत होती. मग आनंदाचं कारण काय होतं? त्याला कारणही चेंडूच ठरला. कारण टीम इंडियाला मिळालेला चेंडू फक्त 8 षटकात बदलावा लागला. कारण त्याचा आकार बदलला होता. भारतीय संघाला मिळालेला हा तिसरा चेंडू होता. हा चेंडू चांगला होता आणि त्याला शाईन होती. त्यामुळे हा चेंडू मिळाल्याने गिल खूश होता.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.