रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत गिलचं मोठं विधान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच काय ते स्पष्ट केलं

वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत 2-0 ने मात दिल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ वनडे क्रिकेट पर्वाची सुरुवात करणार आहे. या दौऱ्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून अपेक्षा ठेवल्या आहेत.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत गिलचं मोठं विधान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच काय ते स्पष्ट केलं
रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत गिलचं मोठं विधान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच काय ते स्पष्ट केलं
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 14, 2025 | 4:04 PM

भारतीय क्रिकेटमध्ये आता नवं पर्व सुरु झालं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. आता गिलकडे वनडे क्रिकेटची धुराही सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून शुबमन गिल वनडे क्रिकेटची धुरा सांभाळणार आहे. शुबमन गिल भारताचा 28वा वनडे क्रिकेट कर्णधार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात पहिलाच दौरा असून कठीण पेपर आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वाकडे लक्ष लागून आहे. असं असताना शुबमन गिलने आतापासून कर्णधारपदाची रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. कोणाकडून काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यानंतर त्याला विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने उत्तर देताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना स्पष्ट मेसेज दिला आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून काय अपेक्षा?

ऑस्ट्रेलिया दौरा हा टीम इंडियासाठी आणि खासकरून शुबमन गिलच्या नेतृत्वाची कसोटी घेणारा दौरा आहे. या दौऱ्यापूर्वी त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून काही अपेक्षा ठेवल्या आहेत. त्याने सांगितलं की, प्रत्येक कर्णधारला आपल्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखा हवा असतो. त्यांच्याकडे 10-15 वर्षांचा अनुभव आहे. मी या दोघांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेऊ इच्छितो. मला फक्त इतकंच हवं आहे की, या दोघांनी मैदानात उतरून त्यांचं बेस्ट द्याव. त्यांची करामत दाखवावी. दरम्यान, ऑस्ट्रेलियात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा रेकॉर्ड चांगला आहे. रोहितने ऑस्ट्रेलियात वनडे 58.23 सरासराने 990 धावा केल्या आहेत. यात 4 शतकांचा समावेश आहे. यात नाबाद 171 सर्वोच्च धावसंख्या आहे.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात 18 वनडे सामन्यात 47.17 च्या सरासरीने 3 शतकं आणि 802 धावा केल्या आहेत. विराट कोहलीची सर्वोत्तम स्कोअर हा 117 आहे. त्यामुळे या दोघांकडून फार अपेक्षा आहे. टीम इंडिया 15 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारताचा पहिला सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे. हा दौरा दोन्ही खेळाडूंचं भवितव्य ठरवणारा आहे. वनडे वर्ल्डकप 2027 च्या दृष्टीने त्यांच्या कामगिरीचं आकलन केलं जाईल. जर या कामगिरीत त्यांनी सिद्ध करून दाखवलं तर नक्कीच त्यांचा पुढे विचार केला जाईल.