IPL 2024 : मस्करीत साहावर आरोप करताना शुभमन गिलने मनातलं दु:ख बोलून दाखवलं का? VIDEO

IPL 2024 : गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात शुभमन गिल मजा, मस्करीच्या मूडमध्ये ऋद्धिमान साहावर एक आरोप करतो. पण हा आरोप करताना खरच शुभमन गिलने त्याच्या मनातील भावना, दु:ख बोलून दाखवलय का?

IPL 2024 : मस्करीत साहावर आरोप करताना शुभमन गिलने मनातलं दु:ख बोलून दाखवलं का? VIDEO
Shubhaman Gill Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 10:40 AM

IPL 2024 मध्ये 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होईल. त्याआधी गुजरात टायटन्सच्या टीममध्ये सर्वकाही ठीक आहे का? हा प्रश्न विचारला जातोय. दिल्ली विरुद्धच्या मॅचआधी एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल टीममधील सहकारी खेळाडू ऋद्धिमान साहावर मोठा आरोप लावताना दिसतोय. गिलने आरोप केल्यानंतर साहाने देखील त्याचं प्रत्युत्तर दिलं. पाठीच्या दुखण्यासामुळे साहा मागचे दोन सामने खेळू शकलेला नाही.

गिल आणि साहामधील आरोप-प्रत्यारोपाच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गुजरात टीमध्ये सर्वकाही ठिक आहे की, खरच काही गडबड आहे? असा प्रश्न विचारला जातोय. त्यासाठी हा व्हिडिओ पाहून समजून घेणं गरजेच आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचआधी हा व्हिडिओ समोर आलाय. दिल्ली विरुद्धच्या मॅचआधी समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये शुभमन गिल साहावर आरोप लावताना दिसतो. पावरप्लेमध्ये साहा आपल्याला जास्त चेंडू खेळायला देत नाही, असा आरोप शुभमनने केला.

गिलला खेळण्यासाठी किती चेंडू हवे?

गिलच्या या आरोपाला उत्तर देताना साहा म्हणाला की, “माझ्यामध्ये जितकी पावर आहे, त्यात पावरप्लेमध्ये मी जास्तीत जास्त खेळू शकतो” गिल म्हणाला की, “कमीत कमी तू मला 14 चेंडू तरी खेळू दे, पण माझ्या वाट्याला 8-9 चेंडूच येतात” गिल आणि साहामधील हे आरोप-प्रत्यारोप मजा-मस्करीचा भाग आहेत. गुजरात टायटन्सच्या टीममधील वातावरण अजिबात खराब नाहीय. कुठलीही गडबड नाहीय, सगळं काही ठीक आहे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.