AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या नाहीतर ‘हा’ खेळाडू होणार कॅप्टन, BCC करणार नवीन प्रयोग?

Cricket : आसीसीच्या टुर्नामेंट झाल्या की रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्याकडे कर्णाधारपद जाणार असल्याचं  बोललं जात आहे. मात्र पंड्याऐवजी दुसऱ्याच एका युवा खेळाडूकडे  जाण्याची शक्यता आहे.

Team India : रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या नाहीतर 'हा' खेळाडू होणार कॅप्टन, BCC करणार नवीन प्रयोग?
| Updated on: Jun 04, 2023 | 6:05 PM
Share

मुंबई : टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा हिटमॅन रोहित शर्मा सांभाळत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघ चांगली कामगिरी करतच आहे, मात्र मोठ्या स्पर्धांमध्ये संघाला अपयश येताना दिसत आहे. आशिया कप 2022, वर्ल्डकप 2022 या मोठ्या स्पर्धांमध्ये दिसून आलं. आता WTC 2023 फायनल, एकदवसीय वर्ल्ड कप 2023 आणि आशिया कप या स्पर्धा यंदाच्या वर्षी होणार आहेत. आयसीसीच्या टुर्नामेंट झाल्या की रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्याकडे कर्णाधारपद जाणार असल्याचं  बोललं जात आहे. मात्र पंड्याऐवजी दुसऱ्याच एका युवा खेळाडूकडे  जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीयआयचाही तसाच काहीसा प्लॅन असू शकतो. हार्दिक पंड्या नाहीतर मग असा कोणता खेळाडू आहे, ज्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शुबमन गिल आहे. 23 वर्षीय गिलला तसा कमीच अनुभव असणार मात्र बीसीसीआय एक प्रयोग म्हणून त्याच्यावर जबाबदारी देऊ शकत.

शुबमन गिलने यंदाच्या आयपीएलमध्ये तीन शतके मारत त्याची ताकद दाखवून दिली आहे. इतकंच नाहीतर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटध्ये शतक झळकवणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक केलं आहे.

शुबमन गिलचा 2018 अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या अंडर-19 संघात त्याचा प्रथम उपकर्णधार म्हणून समावेश करण्यात आला होता. शुभमनने या स्पर्धेत 124.00 च्या सरासरीने 372 धावा केल्या आणि भारताच्या विक्रमी चौथ्या विश्वविजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी येणाऱ्या गिलला स्पर्धेतील म्रॅन ऑफ द ट टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आलं होतं. यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने नाबाद 102 धावांची खेळी केली होती.

दरम्यान, 7 जूनला सुरू होणाऱ्या WTC 2023 च्या फायनल सामन्यात गिलच्या कामिगरीकडे  सर्वांचं लक्ष असणार आहे. भारतात शेर ठरलेला गिल परदेशातही आपला फॉर्म कायम ठेवतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.