SL vs IND: विराट कोहली महारेकॉर्डच्या उंबरठ्यावर, फक्त इतक्या धावांची गरज
Sri Lanka vs India: विराट कोहलीला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. जाणून घ्या.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत असंख्य विक्रम केले आहेत. विराट टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील अंतिम सामन्यात निर्णायक कामगिरी केली. विराटने केलेली अर्धशतकी खेळी ही टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक ठरली. त्यानंतर विराटने आता श्रीलंके विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून कमबॅक केलं आहे. टीम इंडिया-श्रीलंका यांच्यातील पहिला सामना हा बरोबरीत सुटला. टीम इंडियाला विजयासाठी मिळालेल्या 231 धावांचा पाठलाग करताना 230 पर्यंतच पोहचता आलं. विराटने या सामन्यात 24 धावांची खेळी केली. त्यामुळे आता विराट दुसऱ्या सामन्यात महारेकॉर्ड करण्याच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.
विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 27 हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. विराटने आतापर्यंत 113 कसोटी, 293 एकदिवसीय आणि 125 टी 20I सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने या तिन्ही प्रकारात अनुक्रमे 8 हजार 848, 13 हजार 872 आणि 4 हजार 188 अशा धावा केल्या. विराटने तिन्ही प्रकारातील एकूण 531 सामन्यांमधील 589 डावांमध्ये 26 हजार 908 धावा केल्या आहेत. आता विराटला वेगवान 27 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 92 धावांची गरज आहे.
दरम्यान आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त 3 फलंदाजांनाच यश आलं आहे. तसेच सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम हा टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पॉन्टिंग या 3 दिग्गजांनाच आतापर्यंत ही कामगिरी करता आली आहे. त्यामुळे आता विराट या यादीत स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा
सचिन तेंडुलकर, 664 सामने, 34 हजार 357 धावा
कुमार संगकारा, 594 सामने, 28 हजार 16 धावा
रिकी पॉन्टिंग, 560 सामने, 27 हजार 483 धावा
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि हर्षित राणा.
श्रीलंका टीम : चरिथ असालंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश तीक्षना, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराझ, चमिका करुणा, चमिका करुणा, मोहम्मद शिराज मेंडिस, निशान मधुष्का आणि एशान मलिंगा.
