AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs IND: श्रीलंकेच्या कर्णधाराने पराभवाचं खापर कुणावर फोडलं? थेटच म्हणाला…

SL vs IND 3rd T20i: श्रीलंकेने जिंकलेला सामना टीम इंडियाने हिसकावून घेतला. टीम इंडियाने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला आणि श्रीलंकेचा 3-0 ने क्लीन स्वीप केला.

SL vs IND: श्रीलंकेच्या कर्णधाराने पराभवाचं खापर कुणावर फोडलं? थेटच म्हणाला...
charith asalanka
| Updated on: Jul 31, 2024 | 1:55 AM
Share

कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह या जोडीने टीम इंडियाने श्रीलंके विरुद्ध गमावलेला तिसरा आणि शेवटचा टी20i सामना जिंकून दिला. श्रीलंकेची 138 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 110 अशी स्थिती होती. श्रीलंकेने सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंजदाजांनी कमबॅक केलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी लंकेला 27 धावांच्या मोबदल्यात 6 धक्के दिले आणि  सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्ये लंकेने 2 धावा केल्याने भारताला विजयासाठी 3 धावा करायच्या होत्या. सूर्याने चौकार ठोकून भारताला विजयी केलं. टीम इंडियाने यासह विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाने श्रीलंकेला अशाप्रकारे 3-0 ने क्लीन स्वीप दिला. पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार चरित असलंका यांने दु:ख व्यक्त केलं.

चरित असलंका काय म्हणाला?

श्रीलंकेची मधली फळी आणि शेवटचे काही फलंदाज फ्लॉप ठरले. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात 9 विकेट्स या 30 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. दुसऱ्या सामन्यात अवघ्या 31 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स फेकल्या. तर तिसऱ्या सामन्यातही चांगल्या सुरुवातीनंतर श्रीलंकेने अखेरच्या क्षणी टीम इंडियासमोर लोटांगण घातलं. लंकेच्या कामगिरीमुळे कॅप्टन चरितने नारीजी व्यक्त केली.

“टीमच्या कामगिरीमुळे निश्चितच मी निराश आहे. आमचे मधल्या फळीतले आणि त्यानंतरचे फलंदाज हे अपयशी ठरले. फार वाईट फटके मारले. टीम इंडियाचे स्पिनर बॉलिंग करत असल्याने वानिंदु हसरंगाला चौथ्या स्थानी पाठवलं. वानिंदूला फटकेबाजी करण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. मात्र तसं झालं नाही. आम्ही बरेच शॉट चुकीचे खेळलो. तसेच बॉल जुना झाल्यास शॉट सिलेक्शन योग्य ठरत नाही”, असं चरित म्हणाला.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षाना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.