T20I : नववर्षातील पहिल्या टी 20I मालिकेसाठी टीम जाहीर, पहिला सामना केव्हा?
Sri Lanka vs Pakistan T20i Series 2026 : श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने मायदेशात पाकिस्तान विरूद्धच्या या टी 20i मालिकेसाठी 18 खेळाडूंना संधी दिली आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

क्रिकेट चाहत्यांमध्ये भारतात होणाऱ्या टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघात ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. वर्ल्ड कपआधी स्पर्धेतील सहभागी प्रत्येक संघ टी 20I मालिका खेळणार आहे. यजमान टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडेनंतर टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 21 जानेवारीपासून 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. त्याआधी श्रीलंकेने मायदेशात पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या टी 20I सीरिजसाठी संघ जाहीर केला आहे.
श्रीलंका-पाकिस्तान टी 20i मालिका
श्रीलंका पाकिस्तान विरुद्ध मायदेशात बहुप्रतिक्षित वर्ल्ड कपआधी एकूण 3 टी 20I सामने खेळणार आहे. या टी 20I मालिकेचा थरार 7 ते 11 जानेवारी दरम्यान रंगणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी मंगळवारी 6 जानेवारीला 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली.
दासून शनाका या टी 20I मालिकेत श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध वर्ल्ड कपआधी ही शेवटची टी 20I मालिका आहे. तसेच पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामने हे श्रीलंकेत खेळणार आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांपैकी कोणता संघ सरस कामगिरी करतो? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने हे एकाच मैदानात खेळवण्यात येणार आहे. हे तिन्ही सामने दांबुलातील रंगिरी दांबुला स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
श्रीलंकेकडे पाकिस्तानचा हिशोब करण्याची संधी
दरम्यान श्रीलंका-पाकिस्तान दोन्ही संघ अखेरीस रावळपिंडीत आयोजित ट्राय सीरिजमध्ये आमनेसामने आले होते. पाकिस्तानने तेव्हा अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं होतं. त्यामुळे आता श्रीलंकेकडे त्या पराभवाची परतफेड करुन हिशोब चुकता करण्याची संधी आहे.
टी 20I मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 7 जानेवारी
दुसरा सामना, 9 जानेवारी
तिसरा सामना, 11 जानेवारी
पाकिस्तान विरूद्धच्या टी 20I सीरिजसाठी श्रीलंका क्रिकेट टीम : दासुन शनाका(कर्णधार), पाथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल मेंडीस(विकेटकीपर), कुसल परेरा, धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, वानिंदू हसरंगा, कामिंदू मेंडिस, दुनिथ वेल्लालागे, मथीशा पाथिराना, महेश तीक्षना, नुवान तुषारा, ट्रवीन मॅथ्यू, एशान मलिंगा, जेनिथ लियानागे आणि दुष्मंथा चमीरा.
