AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅप्टन Shreyas Iyer पुन्हा अपयशी, फायनलमध्ये पराभव, मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स चॅम्पियन्स

Mumbai South Central Maratha Royals vs SoBo Mumbai Falcons Final Match Result : सिद्धेश लाड याच्या नेतृत्वात मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स टीमने मुंबई टी 20 लीग स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील सोबो मुंबई फालकन्स संघावर मात केली.

कॅप्टन Shreyas Iyer पुन्हा अपयशी, फायनलमध्ये पराभव, मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स चॅम्पियन्स
Shreyas Iyer T20 Mumbai League 2025Image Credit source: SoBo Mumbai Falcons
| Updated on: Jun 13, 2025 | 7:50 AM
Share

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर 10 दिवसांमध्ये कर्णधार म्हणून दुसऱ्यांदा संघाला चॅम्पियन करण्यात अपयशी ठरला आहे. श्रेयसने गेल्या काही महिन्यांमध्ये कर्णधार म्हणून आयपीएल 2024 आणि देशांतर्गत स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिलं. मात्र श्रेयसला गेल्या 10 दिवसांत टीमला ट्रॉफी मिळवून देण्यात अपयश आलं. श्रेयसने आपल्या नेतृत्वात संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं. मात्र अखेरच्या सामन्यात श्रेयसचा संघ ढेर झाला. त्यामुळे ट्रॉफीला मुकावं लागलं. आयपीएलच्या 18 व्या मोसमात श्रेयसच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला आरसीबीकडून पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता सोबो मुंबई फालकन्स संघाला टी 20 मुंबई लीग स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. सिद्धेश लाड याच्या नेतृत्वात मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स संघाने अंतिम सामन्यात सोबो मुंबई फालकन्सवर मात करत ट्रॉफी उंचावली.

मुंबई आणि नवी मुंबईत 4 ते 12 जून दरम्यान टी 20 मुंबई लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या तिसऱ्या हंगामातील अंतिम सामना हा 12 जून रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. महाअंतिम सामन्यात क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे श्रेयस अय्यरच्या सोबो मुंबई फालकन्स संघाच्या कामगिरीकडे होतं. श्रेयसच्या नेतृत्वात पंजाबला आयपीएल 2025 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे श्रेयस टी 20 मुंबई लीग स्पर्धेतील अंतिम सामन्यात विजय मिळवून देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र श्रेयस या स्पर्धेतही अपयशी ठरला.

सामन्यात काय झालं?

सोबो मुंबई फालकन्सने मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्ससमोर 158 धावांचं आव्हान ठेवलं. सोबो मुंबई फालकन्सला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 157 धावांपर्यंतच पोहचता आलं. टॉप 4 मधील फलंदाजांनी घोर निराशा केली. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणाऱ्या अंगकृष रघुवंशी याने 7 धावा केल्या. इशान मुलचंदानी याने 20 धावा जोडल्या. अमोघ भटकळ याने 16 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कर्णधार श्रेयस अय्यर याने बॅटिंगनेही निराशा केली. श्रेयसने 17 बॉलमध्ये 12 रन्स केल्या. त्यामुळे 4 आऊट 72 अशी स्थिती झाली.

त्यानंतर मयुरेश तांडेल आणि हर्ष आघाव या दोघांनी निर्णायक भागीदारी करत टीमला 150 पोहचवलं. मयुरेश आणि हर्ष या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नॉट आऊट 85 रन्सची पार्टनरशीप केली. सोबो मुंबई फालकन्ससाठी मयुरेशने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. मयुरेशने 32 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 156.25 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट फिफ्टी केली. तर हर्षने 28 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 45 धावा केल्या.

मराठा रॉयल्स चॅम्पियन्स

मराठा रॉयल्सने 158 धावांचं आव्हान हे सहज पूर्ण केलं. मराठा रॉयल्सने 4 बॉल राखून 5 विकेट्सआधी हे आव्हान पूर्ण केलं. मराठा रॉयल्सने 19.2 ओव्हरमध्ये 158 धावा केल्या.

चिन्मय सुतार याने विजयात प्रमुख भूमिका बजावली. चिन्मयने 49 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 53 रन्स केल्या. आवेस नौशादने 38 रन्स जोडल्या. साहील जाधव याने 22 धावांचं योगदान दिलं. सचिन यादव याने 19 तर कर्णधार सिद्धेश लाड याने 15 धावा जोडल्या. तर रोहन राजे आणि वैभव माळी या जोडीने टीमला विजयापर्यंत पोहचवलं. रोहन राजे याने नाबद 8 धावा केल्या. तर वैभव माळी आला तसाच नाबाद परतला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.