AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हा प्रत्येक दिवस वाढदिवस असतो, विराट कोहलीच्या शतकावर जडेजा असं का म्हणाला

Ravindra Jadeja on Virat : भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा याने विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीने ४९ वे शतक झळकवात सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. भारताने वर्ल्डकपमध्ये सलग आठवा विजय मिळवला आहे.

तेव्हा प्रत्येक दिवस वाढदिवस असतो, विराट कोहलीच्या शतकावर जडेजा असं का म्हणाला
jadeja on kohli
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 06, 2023 | 4:11 PM
Share

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक 2023 मध्ये सलग 8 वा विजय मिळवला आहे. विराट कोहलीने 101 धावांची खेळी केली. ईडन गार्डन्सवर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी विजय मिळवला. भारताने याआधी श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात जडेजाने 15 चेंडूत 29 धावा देत 5 विकेट घेतले.  विराट कोहलीने त्याच्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.

कोहलीच्या शतकावर जडेजा काय म्हणाला?

भारतीय संघाच्या विजयानंतर रवींद्र जडेजाने प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘जेव्हा आम्ही भारतीय जर्सी घालून खेळतो तेव्हा प्रत्येक दिवस वाढदिवस असतो. कारण ही जर्सी घालण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. वाढदिवसाच्या दिवशी कोणी संघाला विजय मिळवून देत असेल तर यापेक्षा चांगले काय असू शकते?

सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांची बरोबरी करण्याच्या कोहलीच्या विक्रमाबद्दल तो गंमतीने म्हणाला, ’49 किंवा 50 काहीही असले तरी ताटात तूप पडत आहे, हे महत्त्वाचे आहे. विश्वचषक भारतात होत आहे त्यामुळे विक्रम करत राहणे आमच्यासाठी चांगले आहे.

‘विराटसाठी हे एक खास शतक असेल कारण या विकेटवर स्ट्राईक रोटेट करणे, चौकार मारणे आणि नाबाद राहणे ही मोठी कामगिरी होती.

तू तुझ्या कामगिरीबद्दल काय सांगशील?

आपल्या कामगिरीबद्दल तो म्हणाला, ‘गेल्या तीन-चार सामन्यांमध्ये मी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये योगदान देत आहे. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये योगदान दिल्याने आगामी सामन्यांसाठी आत्मविश्वास वाढला आहे. कठीण परिस्थितीत 30-40 धावा करणे आणि गोलंदाजीतील भागीदारी तोडणे ही अष्टपैलू खेळाडूची भूमिका असते. संघाच्या गरजेनुसार मी प्रभावी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मी क्षेत्ररक्षणाला कधीच हलके घेत नाही.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता