धमाकेदार! 37 मिनिटांची विजयी खेळी, 21 वर्षीय फलंदाजाची कमाल, 15 चेंडूत 453 च्या स्ट्राईक रेटने ठोकले अर्धशतक

संघ अडचणीत सापडला असताना अनेकदा संयमी खेळी करत विजय मिळवून दिल्याची उदाहरणं आपण पाहिली आहे. पण एका 21 वर्षीय युवा खेळाडूने तूफानी खेळी करत 37 मिनिटांत संघाला जिंकवून दिलं.

धमाकेदार! 37 मिनिटांची विजयी खेळी, 21 वर्षीय फलंदाजाची कमाल, 15 चेंडूत 453 च्या स्ट्राईक रेटने ठोकले अर्धशतक
टॉम लॅमॉनबी
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 11:44 AM

लंडन : क्रिकेट (Cricket) म्हटलं की विजय-पराभव आलाच… पण काही वेळेस अगदी अशक्य वाटणारा सामनाही एखादा संघ जिंकतो आणि त्यावेळी त्या संघातील मॅच विनर खेळाडूची खेळी खरचं पाहण्याजोगी असते. अशीच खेळी इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या T-20 ब्लास्ट (T20 Blast) मध्ये 21 वर्षी युवा फलंदाज टॉम लॅमॉनबी (Tom Lammonby) याने खेळली. समरसेट (Somerset) संघाच्या या खेळाडूने ग्लूसेस्टरशर (Gloucestershire) संघाविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली.

सामन्यात प्रथम समरसेट संघाची फलंदाजी होती. पण सलामीवीरांच्या निराशाजनक खेळीमुळे समरसेटचे 50 धावांवरच 3 विकेट्स गेले. 100 धावा होईपर्यंत 5 फलंदाज तंबूत परतले. वाटले की ग्लूसेस्टरशर सामन्यावर आपली पकड बसवून एक सोपं टार्गेट मिळवेल. पण त्याचवेळी समरसेटकडून 21 वर्षीय टॉम लॅमॉनबी याने मैदानावर पाऊल ठेवले. मैदानावर येताच टॉम धावांचा वर्षा करु लागला.

37 मिनिटांत 90 धावा

टॉमने अवघ्या 37 मिनिटं फलंदाजी केली. पण तेवढ्या वेळेतच 36 बॉल्समध्ये 250 च्या स्ट्राइक रेटने त्याने 90 धावा केल्या. ज्यात 11 चौकार आणि 4 षटकार सामिल होते. जर अर्धशतकाचा विचार केला तर 36 पैकी 15 चेंडूतच टॉमचा स्ट्राईक रेट 453 होता. ज्यात त्याने 68 धावा ठोकल्या. याच खेळीच्या जोरावर समरसेटने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्सच्या बदल्यात 183 धावा केल्या.

23 धावांनी समरसेट विजयी

त्यानंतर ग्लूसेस्टरशरचा संघ 184 धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात आला. पण त्यांची सुरुवातच धिम्यागतीने झाली आणि अखेरपर्यंत तशीच राहिली. त्यामुळे ग्लूसेस्टरशरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्चया बदल्यात 160 धावांपर्यंतच मजल मारली. ज्यामुळे समरसेट 23 धावंनी सामना जिंकला.

हे ही वाचा :

IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध विजयासह शिखरने गाठले रेकॉर्ड्सचे ‘शिखर’, एकाच सामन्यात अनेक विक्रम

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

(Somerset Batsman Tom Lammonby Played Terrific Innigns Against Gloucestershire in t20 Blast)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.