सौरव गांगुलीची पत्नी डोना यांनी अखेर चढली पोलीस स्टेशनची पायरी, झालं असं की….
सौरव गांगुलीची पत्नी डोना यांना ऑनलाईन ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगच्या त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. वारंवार होत असलेल्या अभद्र टिपण्यांमुळे त्यांनी अखेर पोलीस स्टेशनची पायरी चढली आहे. कलात्मक ओळख आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचलच्याचं त्यांनी तक्रारीत म्हंटलं आहे.

सोशल मिडिया हे दुधारी शस्त्र आहे. अनेकांना या माध्यमाचा फायदा झाला आणि काही जणांना तोटाही झाला आहे. असाच फटका माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली हीला बसला आहे. डोना गांगुली या प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगणा आहेत. गेली 45 वर्षे त्या एका व्यावसायिक ओडिसी नृत्याचं सादरीकरण करत आहेत. त्यांनी देशविदेशात आपल्या कलेचं सादरीकरण केलं आहे. त्यांना या कलेसाठी पश्चिम बंगाल सरकारने सन्मानित देखील केलं आहे. नुकतंच त्यांनी कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये सादरीकरण केलं होतं. मात्र त्यानंतर त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या. त्याच्या फेसबुक पेजवर निशाणा साधण्यात आला. त्यांच्या पोस्टखाली अभद्र टिपण्या दिसून आल्या. त्यामुळे डोना गांगुलींचा संताप झाला. त्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि अभद्र कमेंट्सची तक्रार नोंदवली. डोना गांगुली यांनी ठाकुरपुकुर पोलीस ठाण्यात बॉडी शेमिंग आणि अभद्र कमेंट्सप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी डोना गांगुली यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याचाी नोंद केली असून तपास सुरु केला आहे. या पोस्टमागे त्याचा नेमका हेतू काय? हे तपास अधिकारी डिजिटल पुराव्यांच्या आधारे शोध घेतल आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली आहे. आरोपीची ओळख पटली तर त्याच्यावर मानहानी, साबयर धमकी आणि आयटी कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. डोना गांगुली यांनी सांगितलं की, या पोस्ट जाणीवपूर्वक त्यांना बदनाम करण्याच्या हेतून पोस्ट केल्या गेल्या आहे. त्यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याने ही तक्रार नोंदवल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, डोना गांगुली यांनी यात वर्षी कोलकाता पोलिसात एक तक्रार नोंदवली होती. त्यात त्यांनी एका महिला युट्यूबवर कुटुंबाची प्रतिमा डागलल्याप्रकरणी आरोप केला.
डोना गांगुली यांच्यासोबत 2021 मध्ये असाच प्रकार घडला होता. चार वर्षापूर्वी नोंदवलेल्या तक्रारीत त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या नावाने एक बनावट फेसबुक पेज चालवलं जात आहे. त्यांच्या संमतीशिवाय या पेजवर सौरव गांगुली, त्यांच्या मुलीचा फोटो शेअर केला होता.
