Cricket : तो पुन्हा येतोय, भारत-पाक सामन्यानंतर स्टार खेळाडूने निवृत्तीचा निर्णय बदलला, कोण आहे तो?
Odi Cricket Retirement: दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम पाकिस्तान दौऱ्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 2 कसोटी आणि प्रत्येकी 3-3 सामन्यांची टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी एकदिवसीय संघात क्विंटन डी कॉक याचं कमबॅक झालं आहे. डी कॉकने निवृत्तीतून माघार घेतली आहे.

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघाने रविवारी 21 सप्टेंबरला आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत पाकिस्तानवर मात केली. भारताने यासह सलग चौथा तर पाकिस्तान विरुद्धचा दुसरा विजय मिळवला. या सामन्याच्या काही तासांनंतर क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. स्टार आणि माजी खेळाडूने पाकिस्तान विरूद्ध खेळण्यासाठी निवृत्तीचा निर्णय बदलला आहे. इतकंच नाही तर निवड समितीने या खेळाडूला संघात संधी दिली आहे. नक्की तो खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या आशिया कप स्पर्धेत खेळत आहे. आशिया कप स्पर्धेची सांगता रविवारी 28 सप्टेंबरला होणार आहे. पाकिस्तान मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी तसेच 3-3 सामन्यांची टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान दौऱ्यातील तिन्ही मालिकांसाठी संघाची घोषणा केली आहे. त्यानुसार एडन मारक्रम कसोटी संघाचं नेतृत्व करणार आहे. डेव्हिड मिलर टी 20i संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर मॅथ्यू ब्रिट्झके याच्याकडे एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. उभयसंघात 12 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान या तिन्ही मालिकांचा थरार पार पडणार आहे.
क्विंटन डी कॉकची निवृत्तीतून माघार
दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉक याने एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय 2 वर्षांनंतर बदलला आहे. क्विंटन पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. क्विंटनने वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेनंतर निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आता क्विंटन पुन्हा एकदा फटकेबाजी करताना दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकांची प्रतिक्रिया काय?
“क्विंटनचं व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये (वनडे-टी 20i) परतणं ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. आमचं गेल्या महिन्यात क्विंटनसह बोलणं झालं. तेव्हा क्विंटनच्या बोलण्यातून देशासाठी अजूनही खेळण्याची महत्वाकांक्षा जाणवली. क्विंटनच्या कमबॅकमुळे टीमला फायदा होईल”, असं दक्षिण आफ्रिकेचे हेड कोच शुकरी कॉनराड यांनी म्हटलं.
पाकिस्तान विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : डेव्हीड मिलर (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हीस, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्जी, क्विंटन डी कॉक, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, लुंगी एन्गिडी, नकाबा पीटर, लुआन-ड्रे प्रीटोरियस, एंडिले सिमलेन आणि लिजाद विलियम्स.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकांचं वेळापत्रक
Save the date! 🗓
The Proteas Men are heading to Pakistan for a thrilling tour that will feature 2 Test matches, 3 ODIs, and 3 T20Is. 🇿🇦🏏
It’s going to be action-packed; be sure not to miss it! 🔥#WozaNawe pic.twitter.com/1r3eqbXvuk
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 8, 2025
पाकिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : मॅथ्यू ब्रीट्जके (कॅप्टन), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, नंद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्जी, क्विंटन डी कॉक, टोनी डी जोरजी, डोनोवन फरेरा, ब्योर्न फोर्टुइन, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, लुंगी एन्गिडी, नकाबा पीटर, लुआन-ड्रे प्रीटोरियस आणि सिनेथेंबा केशिले.
