AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket : दुखापतीमुळे कर्णधार दुसऱ्या कसोटीतून आऊट, टीमला झटका, शतक करणाऱ्या खेळाडूकडे कॅप्टन्सी

Test Cricket Captaincy : दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज याच्याकडे झिंबाब्वे दौऱ्यात कर्णधारपदाची जबाबदारी आहे. मात्र केशवला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Test Cricket : दुखापतीमुळे कर्णधार दुसऱ्या कसोटीतून आऊट, टीमला झटका, शतक करणाऱ्या खेळाडूकडे कॅप्टन्सी
Clean BowledImage Credit source: AFP
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 02, 2025 | 5:24 PM
Share

क्रिकेट विश्वात सध्या कसोटी सामन्यांचा थरार पाहायला मिळत आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 चा किताब पटकावला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका सध्या झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. झिंबाब्वे दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेने प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे या दौऱ्यात भारतीय वंशाच्या केशव महाराज याला नेतृत्वाची संधी देण्यात आली.

केशव महाराज याने त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला विजयी सुरुवात करुन दिली. तर आता झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना हा 6 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार दुखापतीमुळे दुसर्‍या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ‘प्रोटियस मेन’ या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

केशव महाराज याला ग्रोईन इंजरीमुळे दुसऱ्या सामन्याला मुकावं लागलं आहे. केशवला पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी बॅटिंग करताना डाव्या पायाच्या मांडीला दुखापत झाली. केशवला या दुखापतीमुळे झिंबाब्वे विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे केशवच्या अनुपस्थितीत आता ऑलराउंडर वियान मुल्डर याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

केशवने पहिल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. केशवने पहिल्या डावात 21 तर दुसऱ्या डावात 51 धावा केल्या. तसेच केशवने एकूण 4 विकेट्स घेतल्या. केशव यासह दक्षिण आफ्रिकेसाठी 200 विकेट्स घेणारा पहिला फिरकीपटू ठरला.

वियान मुल्डरकडे नेतृत्व

दक्षिण आफ्रिका टीम मॅनजमेंटने दुसऱ्या सामन्यात कर्णधार कोण असणार? हे देखील जाहीर केलं आहे. वियान मुल्डर याची नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. वियानने आतापर्यंत 87 रेड बॉल सामने खेळले आहेत. वियानने 87 पैकी 20 कसोटी सामने खेळले आहेत. वियानने लीसेस्टरशायरसाठी एका वनडे कप स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये नेतृत्व केलं होतं.

वियानने झिंबाब्वे विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात वियानने कसोटी कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. वियानने 147 धावा केल्या होत्या.

दुसऱ्या कसोटीआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघात मोठ्या घडामोडी

केशवच्या जागी कोण?

दरम्यान केशव महाराज याच्या जागी कसोटी संघात फिरकीपटू सेनुरन मुथुसामी याचा समावेश करण्यात आला आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा