बुमराहच्या बावुमाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दक्षिण अफ्रिकन प्रशिक्षकाचं उत्तर, म्हणाला…
भारत दक्षिण अफ्रिका कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पडली आहे. जसप्रीत बुमराहने बोलण्याच्या ओघात म्हणून गेला. पण त्यावरून वादाला फोडणी मिळाली आहे. आता दक्षिण अफ्रिकेच्या प्रशिक्षकाने उत्तर दिलं आहे.

भारत दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरु आहे. या सामन्यातील पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. पण या दिवसाला वादाची फोडणी मिळाली. जसप्रीत बुमराहने दक्षिण अफ्रिकेचा निम्मा संघ बाद करत 159 धावांवर रोखलं. त्यामुळे भारताची बाजू भक्कम आहे. पण जसप्रीत बुमराहने एक अपील करताना केलेलं वक्तव्य वादास कारण ठरलं आहे. जसप्रीत बुमराहने दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाच्या शरीर यष्टीवरून वक्तव्य केलं. हे वक्तव्य स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं आणि सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरलं. यावरून जसप्रीत बुमराह टीकेचा धनी ठरत आहे. खरं तर अनावधानाने त्याच्याकडून झालं असं असावं असंही काही जणांचं म्हणणं आहे. पण एकदा वाद पेटला की तो लगेच शमत नाही हे देखील तितकंच खरं आहे.
दक्षिण अफ्रिकेचा बॅटिंग प्रशिक्षक एशवेल प्रिन्स याने या प्रकरणावर आता भाष्य केलं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रिन्स यांनी सांगितलं की, ‘नाही. कोणतीही चर्चा होणार नाही. हे पहिल्यांदाच माझ्या लक्षात आलं आहे. पण मला वाटत नाही की यामुळे काही अडचण येईल. ‘ प्रिन्स यांनी पुढे या प्रश्नाला बगल देत सांगितलं की, सिराजला त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये लय काही जमली नाही. पण दुसऱ्या स्पेलमध्ये एंड बदलल्यानंतर त्याला लय मिळाली. त्याला लाईन अँड लेंथ सापडली. बुमराहच्या षटकावरही धावा होत होत्या. फिरकीपटूही चांगलं करत होते. यासाठी मला वाटतं की, कधी कधी चांगल्या चेंडूवरही फलंदाज धावा काढतात. याबाबत मी काही जास्त सांगू शकत नाही. आम्हाला आणखी मेहनत घ्यावी लागेल. अजूनही मोठा पल्ला आहे. आम्हाला आशा आहे की दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करू.
Most Shameful and Unlikeable Team of Cricket-India. Jasprit Bumrah and Rishabh Pant should be immediately banned and India should apologise to Temba Bavuma. Shame on Commentators as well for not pointing it outpic.twitter.com/XYPSUOd8Ks
— Aryan Goel (@Aryan42832Goel) November 14, 2025
नेमकं काय घडलं?
कर्णधार शुबमन गिलने 13वं षटक जसप्रीत बुमराहकडे सोपवलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने मार्करमची विकेट काढली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेवर दबाव वाढला होता. त्यानंतर टेम्बा बावुमा फलंदाजीला आला. याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर बावुमाच्या पायावर चेंडू आदळला आणि जोरदार अपील करण्यात आलं . पंचांनी बाद दिलं नाही. त्यानंतर पंत आणि बुमराह यांच्यात डीआरएसवरून चर्चा झाली. तेव्हा बुमराहच्या तोंडून वादग्रस्त शब्द बाहेर पडले.
