AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virender Sehwag Tweet Viral : आवेश खानवर बोलताना सेहवागचा ट्वीटरवरील ‘आवेश’ इतका भारीये, की चर्चा तर होणारच

काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतरही वीरेंद्र सेहवागनं सोशल मीडियावर चांगलीच धुम ठोकली

Virender Sehwag Tweet Viral : आवेश खानवर बोलताना सेहवागचा ट्वीटरवरील 'आवेश' इतका भारीये, की चर्चा तर होणारच
वीरेंद्रचं ट्विट चर्चेतImage Credit source: social
| Updated on: Jun 18, 2022 | 9:14 AM
Share

नवी दिल्ली :  शुक्रवारी भारताच्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा (South Africa team) डाव 17 षटकात 87 धावातच आटोपला. या मोठ्या फरकानं भारतानं विजय संपादन केलाय. राजकोट (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतानं पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (IND vs SA) जबरदस्त कमबॅक केलं. या मोठ्या विजयामुळे दोन्ही संघानं आता 2-2 अशी बरोबरी केली आहे. यामध्ये विशेष लक्ष वेधलं ते दिनेश कार्तिक आणि आवेशनं.  दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या काल सामन्याचा संकटमोचक होते. दिनेशने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याला उपकर्णधार हार्दिक पंड्यानं देखील तितकीच तोलामोलाची साथ दिली. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. दिनेश कार्तिकने 27 चेंडूत 55 आणि हार्दिक पंड्याने 31 चेंडूत 46 धावा फटकावल्या. या दोघांच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकात 6 बाद 169 धावा केल्या. कालच्या सामन्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं एक ट्विट केलं आणि ते चांगलंच व्हायरल झालंय.

वीरेंद्रनं नेमकं काय म्हटलंय?

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतरही वीरेंद्र सेहवागनं सोशल मीडियावर चांगलीच धुम ठोकली. यावेळी त्यानं एक ट्विट केलं आणि ते चांगलंच व्हायरलंही झालं. तुम्हाला माहिती आहे का, स्कॅम 1992 या प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये हर्षद मेहता याचा एक डायलॉग खूप व्हायरल झालाय. त्याच्या सोशल मीडियावर अनेक मिम्स देखील बनवल्या गेल्या आहेत. अशीक एक मीम्स वीरेंद्र सेहवागनं टविट केलीय. ‘अब खेलने का नहीं *** का समय है. ‘ .’हा मीम शेअर करताना सेहवागनं लिहिले की, ‘आज (शुक्रवारी) डीके आणि त्यानंतर आवेश खान, ज्यांच्या निवडीवर पहिल्या तीन सामन्यांमध्ये विकेट न घेतल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं होतं. त्यांनीच टीम इंडियाला जिंकवलं आहे.’

कालच्या सामन्यात काय झालं?

भारताच्या विजयाचे नायक काल दिनेश कार्तिक आणि आवेश खान ठरले. कार्तिकनं 55 धावा दिल्या, तर आवेश खानने चार षटकात केवळ 18 धावा देत चार बळी घेतले. सामन्यानंतर सेहवागने असे ट्विट केले, जे खूप व्हायरल होत आहे. दिनेश कार्तिकच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 6 बाद 169 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला 16.5 षटकांत केवळ 87 धावांत रोखले आणि सामना 82 धावांनी जिंकला.पाच सामन्यांची मालिका सध्या 2-2 अशी बरोबरीत आहे आणि निर्णायक सामना 19 जून रोजी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.