T 20 World Cup: फायनल संघ निवडण्यासाठी Rahul Dravid यांच्याकडे फक्त चार चान्स, ICC कडून अंतिम यादी सोपवण्याची तारीख जाहीर

आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup) अंतिम संघ निवडण्याची मुदत जाहीर झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्व क्रिकेट बोर्डांना 15 सप्टेंबरपर्यंत 15 सदस्यीय संघाची यादी सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.

T 20 World Cup: फायनल संघ निवडण्यासाठी Rahul Dravid यांच्याकडे फक्त चार चान्स, ICC कडून अंतिम यादी सोपवण्याची तारीख जाहीर
राहुल द्रवीड, प्रशिक्षक, भारतीय क्रिकेट संघImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 2:47 PM

मुंबई: आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup) अंतिम संघ निवडण्याची मुदत जाहीर झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्व क्रिकेट बोर्डांना 15 सप्टेंबरपर्यंत 15 सदस्यीय संघाची यादी सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. आता हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडे टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ निवड करण्याकरता फक्त चार संधी उरल्या आहेत. यंदा ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. आता हेड कोच राहुल द्रविड यांच्याकडे अंतिम संघ निश्चित करण्यासाठी फक्त काही सामने उरले आहेत. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून जिव्हारी लागणारा पराभव झाला होता. आता त्या सर्व कटू आठवणी पुसून नव्याने झेप घेण्याची टीम इंडियाकडे संधी आहे.

पहिली संधी –

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयर्लंडमध्ये दोन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

दुसरी संधी –

जुलै महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयपीएल 2022 नंतर भारतीय संघ या मालिकेत पूर्ण ताकदीने खेळताना दिसणार आहे.

तिसरी संधी –

इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर तोच संघ वेस्ट इंडिजला जाऊ शकतो. तिथे वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

चौथी संधी –

27 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धा होणार आहे. सामन्याच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत.

कसं आहे वेळापत्रक

26 जून आणि 28 जून असे आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामने खेळणार आहे.

7 जुलै ते 10 जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची सीरीज होईल.

29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी 20 सामन्याची मालिका होईल.

27 ऑगस्टपासून टी 20 आशिया कप स्पर्धा सुरु होणार आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.