AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs DC : हैदराबादची हॅट्रिक, ऑरेंज आर्मीकडून दिल्लीचा 47 धावांनी धुव्वा

Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Match Result, IPL 2026 : सनरायजर्स हैदराबादने सलग 2 सामने गमावल्यानंतर यशस्वीपणे विजयी घोडदौड कायम राखली आहे. हैदराबादने दिल्लीला पराभूत करुन विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे.

SRH vs DC : हैदराबादची हॅट्रिक, ऑरेंज आर्मीकडून दिल्लीचा 47  धावांनी धुव्वा
Eshan Malinga SRH vs DCImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 22, 2026 | 2:08 AM
Share

सनरायजर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 31 व्या सामन्यात घरच्या मैदानात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्सवर एकतर्फी विजय मिळवला आहे. हैदराबादने दिल्लीचा 47 धावांनी धुव्वा उडवला. ओपनर अभिषेक शर्मा याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने दिल्लीसमोर 243 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दिल्लीला हैदराबादच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 195 धावांपर्यंतच पोहचता आलं. हैदराबादने अशाप्रकारे एकूण चौथा आणि सलग तिसरा विजय मिळवला. अभिषेक शर्मा आणि इशान मलिंगा हे दोघे हैदराबादच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अभिषेकने नाबाद 135 धावांची खेळी केली. तर एशान मलिंगा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेत बॉलिंगने हैदराबादच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर दिल्लीचा हा एकूण तिसरा पराभव ठरला.

दिल्लीने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादने या संधीचा फायदा घेत पुन्हा एकदा 200 पार मजल मारली. हैदाराबादची 200 पेक्षा अधिक धावा करण्याची ही 16 वी वेळ ठरली. हैदराबादसाठी ओपनर अभिषेक शर्मा याने नाबाद आणि सर्वाधिक 135 धावा केल्या. अभिषेकने 135 पैकी 100 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. अभिषेकने 10 चौकार आणि 10 षटकार खेचेले. अभिषेकसोबत हेन्रिक क्लासेन नॉट आऊट परतला. क्लासेनने 37 धाव केल्या. ट्रेव्हीस हेड याने 37 तर कॅप्टन इशान किशन याने 25 धावा जोडल्या. दिल्लीसाठी अक्षर पटेल याने एकमेव विकेट मिळवली.

दिल्लीची बॅटिंग

दिल्लीच्या फलंदाजांनी विजयी आव्हानाजवळ पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्लीकडून नितीश राणापैकी एकालाही अर्धशतकी खेळी करता आली नाही. त्यामुळे दिल्लीचे प्रयत्न अपुरे पडेल. नितीशने सर्वाधिक 57 धावा केल्या. चौघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. समीर रिझवी याने 41, केएल राहुल 37, ट्रिस्टन स्टब्स 27 आणि आशुतोष शर्मा याने 14 धावा जोडल्या. डेव्हिड मिलरकडून अनेक आशा होता. त्यामुळे एशान मलिंगा याने मिलरचा पहिल्याच बॉलवर काटा काढला. तर इतरांनी गुडघे टेकले.

स्कोअरकार्ड

एशान मलिंगाचा विकेट्सचा चौकार

हैदराबादसाठी एशान मलिंगा याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर हर्ष दुबे याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर दिलशान मदुशंका आणि शाकीब हुसैन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी