Test Cricket : पहिल्या टेस्टसाठी टीमची घोषणा, या दिग्गजाचा शेवटचा सामना, टीम विजयी निरोप देणार?
Squad For 1st Test Match : कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम मॅनेजमेंटने टीम जाहीर केली आहे. त्यानुसार दिग्गज खेळाडू हा सामना खेळून निवृत्त होणार आहे. जाणून घ्या.

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 20 जूनपासून शुबमन गिल याच्या नेतृत्वात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.या मालिकेसाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. तर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटसमोर प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी द्याची आणि कुणाला नाही? हा मोठा पेच आहे. कसोटी मालिकेआधी इंग्लंड लायन्स विरुद्ध झालेल्या 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचची सीरिज 0-0 ने बरोबरीत राहिली. या मालिकेत इंडिया एच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टेस्टसाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे काही जांगाचा तिढा अजूनही कायम आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या टेस्टसाठी टीम जाहीर केली आहे.
बांगलादेश क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यात कसोटी, वनडे आणि टी 20i मालिका खेळणार आहे. श्रीलंकेने पहिल्या कसोटीसाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. त्यानुसार पहिल्यांदाच संघात 6 अनकॅप्ड खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. धनंजय डी सिल्वा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तसेच अनुभवी ऑलराउंडर अँजलो मॅथ्यूज त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळून निवृत्त होणार आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट टीम अँजलोला विजयी निरोप देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
अँजलोने 23 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तसेच बांगलादेश विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार असल्याचं जाहीर केलं होतं.
6 अनकॅप्ड खेळाडूंची निवड
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी तब्बल 6 अनकॅप्ड खेळाडूंची निवड केली आहे. या 6 खेळाडूंमध्ये लाहिरु उडारा, पसिंदु सोरियाबंडारा, सोनल दिनुशा, पवन रत्नानायके, थारिंडू रत्नानायके आणि इथिसा विजेसुंदरा यांचा समावेश आहे. उभयसंघात 17 ते 21 जून दरम्यान पहिला सामना होणार आहे. हा सामना गॉलमध्ये होणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा 25 ते 29 जून दरम्यान होणार आहे.
पहिल्या सामन्यासाठी 18 खेळाडूंची निवड
Sri Lanka include fresh faces in squad to take on Bangladesh in first Test at Galle 💪#SLvBANhttps://t.co/3bOdwIVBWl
— ICC (@ICC) June 15, 2025
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 17 ते 21 जून, गॉल
दुसरा सामना, 25 ते 29 जून, कोलंबो
दुसऱ्या बाजूला बांगलादेशने या कसोटी मालिकेसाठी आधीची घोषणा केली आहे. बांगलादेश क्रिकेट टीम 12 जून रोजी श्रीलंकेत दाखल झाली आहे. उभयसंघात कसोटी मालिकेनंतर 3 वनडे आणि 3 टी 20i मॅचेस होणार आहेत.
