AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन तेंडुलकरवर श्री सत्य साईबाबांची कृपादृष्टी! 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान काय घडलं ते सांगितलं?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची श्री सत्य साईबाबांवर नितांत श्रद्धा आहे. सचिन तेंडुलकर सत्य साईबाबांचा भक्त आहे, हे जगजाहीर आहे. असं असताना सचिन तेंडुलकरने 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान आलेला अनुभव सांगितला आहे.

सचिन तेंडुलकरवर श्री सत्य साईबाबांची कृपादृष्टी! 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान काय घडलं ते सांगितलं?
सचिन तेंडुलकरवर सत्य साईबाबांची कृपादृष्टी! 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान काय घडलं ते सांगितलं?Image Credit source: PTI
| Updated on: Nov 19, 2025 | 4:07 PM
Share

मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेला सचिन तेंडुलकर श्री सत्य साईबाबांच्या भक्तगणांपैकी एक आहे. सचिन तेंडुलकर अनेकदा सत्य साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी गेला आहे. आताही सचिन तेंडुलकर त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात असतो. नुकताच श्री सत्य साईबाबा यांच्या शताब्दी समारंभात त्याने हजेरी लावली. यावेळी सचिनने त्यांच्यासोबत एक अनुभव शेअर केला आहे. आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे पार पडलेल्या शताब्धी समारंभात उपस्थित असलेल्या भारतरत्न सचिन तेंडुलकर याने 2011 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान सत्य साईबाबांशी निगडीत एक अनुभव सांगितला. स्पर्धेदरम्यान कसा आत्मविश्वास दिला याबाबत सांगितलं. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने, श्री सत्य साईबाबा यांचा त्याच्या जीवनावर कसा प्रभाव होता याबाबतही सांगितलं.

वनडे वर्ल्डकप 2011 मध्ये काय झालं होतं?

सचिन तेंडुलकरने सांगितलं की, हा शेवटचा वनडे वर्ल्डकप आहे हे माहिती होतं. क्रिकेटमधील सर्वात मोठी ट्रॉफी जिंकण्याची शेवटची संधी होती. संघासोबत बंगळुरुमधील एका कॅम्पमध्ये आला होता आणि नेमका तेव्हाच एक फोन आला. त्यात सांगितलं की, बाबांनी एक पुस्तक पाठवले आहे. ते ऐकून आनंदाला पारावर उरला नाही. त्यामुळे मनात भावना आल्या की हा वनडे वर्ल्डकप त्याच्यासाठी खास असणार आहे. बाबांच्या पुस्तकाने त्याला आत्मिक शक्ती दिली आणि आत्मविश्वास वाढला. सचिन तेंडुलकरने सांगितलं की, हे पुस्तक संपूर्ण स्पर्धेत त्याच्यासोबत खऱ्या साथीदारासारखे राहिले.

Sachin_Tendulkar (11)

सचिन तेंडुलकर म्हणाला की, ‘2011 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत काय घडलं हे सर्वांना माहिती आहे. जेव्हा भारताने मुंबईत श्रीलंकेला पराभूत करून जेतेपद जिंकलं. तेव्हा संपूर्ण देशात आनंदाने जल्लोष झाला. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील हा सुवर्ण क्षण होता. मला वाटत नाही की मी माझ्या कारकिर्दीत यापेक्षा चांगला अनुभव घेतला असेल. संपूर्ण देश आनंदात पाहण्याची संधी मिळाली.’ सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला की, हे सर्व काही शक्य झालं कारण श्री सत्य साई बाबा यांचे आशीर्वाद पाठीशी होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...