AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India T20 World cup Squad: मोहम्मद शमीला वगळल्याने माजी कॅप्टन भडकला, सिलेक्शन कमिटीला सुनावलं

ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी टीम इंडिया जाहीर झाली आहे. बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीने सोमवारी 15 सदस्यीय टीमची घोषणा केली.

India T20 World cup Squad: मोहम्मद शमीला वगळल्याने माजी कॅप्टन भडकला, सिलेक्शन कमिटीला सुनावलं
मोहम्मद शमीImage Credit source: twitter
| Updated on: Sep 13, 2022 | 7:19 PM
Share

मुंबई: ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी टीम इंडिया जाहीर झाली आहे. बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीने सोमवारी 15 सदस्यीय टीमची घोषणा केली. चार खेळाडूंना स्टँडबायवर ठेवलं आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीच नाव मुख्य टीममध्ये नाहीय. श्रेयस अय्यरलाही स्थान मिळालेलं नाही. दोघेही स्टँडबायवर आहेत.

मोहम्मद शमीला मुख्य टीममध्ये स्थान न दिल्याने माजी कॅप्टन कृष्णामचारी श्रीकांत नाराज झाले आहेत. शमी टीममध्ये नाहीय, त्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

तो रायटी आणि लेफ्टी दोन्ही फलंदाजांसाठी धोकादायक

“मोहम्मद शमी टीममध्ये पाहिजे होता. तुम्ही ऑस्ट्रेलियात खेळण्याच प्लानिंग करताय. शमीच्या चेंडूंना ऑस्ट्रेलियात चांगली उसळी मिळू शकते. त्याची हाय ऑर्म Action आहे. रायटी फलंदाज समोर असेल, तर तो चेंडू आत आणू शकतो. लेफ्टी असेल, तर बाहेर काढू शकतो. सुरुवातीच्या तीन ओव्हर्समध्ये तो दोन-तीन विकेट काढू शकतो” असं कृष्णामचारी श्रीकांत म्हणाले.

अनुभवाऐवजी युवा खेळाडूंना प्राधान्य

निवडकर्त्यांनी शमीच्या अनुभवाऐवजी युवा खेळाडूंना प्राधान्य दिलय. टीममध्ये अर्शदीप सिंह आणि हर्षल पटेलची निवड झाली आहे. दोघांनी आयपीएलमध्ये दमदार खेळ दाखवला. त्या बळावर टीम इंडियात स्थान मिळवलं. अर्शदीप सिंहने जुलैमध्येट टी 20 मध्ये डेब्यु केला.

डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याच कौशल्य

डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याच कौशल्य अर्शदीप सिंहकडे आहे. त्या बळावरच त्याची वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड झाली आहे. तो आतापर्यंत टीम इंडियासाठी फक्त 11 टी 20 सामने खेळलाय. हर्षल पटेल 17 आणि शमी सुद्धा तितकेच टी 20 सामने खेळलाय.

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.