Sunil Gavaskar : सुनील गावस्करांचा मोठा सन्मान, पहिल्यांदाच भारतीय खेळाडूच्या नावावर इंग्लंडमध्ये स्टेडियम

गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत. कसोटीत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांचा विक्रम सचिन तेंडुलकरने मोडलाय. आज त्यांचा सन्मान होतोय.

Sunil Gavaskar : सुनील गावस्करांचा मोठा सन्मान, पहिल्यांदाच भारतीय खेळाडूच्या नावावर इंग्लंडमध्ये स्टेडियम
भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्करImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 8:51 AM

मुंबई : भारतीय क्रिकेटला (Indian Cricket) इंग्लंडमध्ये (England) मोठा मान मिळाला आहे. इंग्लंडमधील स्टेडियमला ​​भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचं नाव देण्यात येणार आहे. आज लेस्टर क्रिकेट मैदानाचं नाव बदलण्यात येणार आहे. इंग्लंडमधील एखाद्या स्टेडियमला ​​भारतीय क्रिकेटपटूचं नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेतील केंटकी येथील एका मैदानाचे नाव ‘सुनील गावस्कर फील्ड’ आहे. त्याचवेळी टांझानियातील जानसीबारमध्ये ‘सुनील गावस्कर क्रिकेट स्टेडियम’ तयार केले जात आहे. आता गावस्कर यांना इंग्लंडमध्ये हा मान मिळाला आहे. लीसेस्टर क्रिकेट मैदानाचं नाव बदलण्याची मोहीम भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ यांनी सुरू केली होती. त्यांनी दीर्घकाळ लीसेस्टरचे प्रतिनिधित्व केलंय. गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत. कसोटीत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांचा विक्रम सचिन तेंडुलकरने मोडलाय.

गावस्कर काय म्हणालेत?

या सन्मानाबाबत गावसकर म्हणाले, ‘मला खूप आनंद झाला आहे आणि मला सन्मानित करण्यात येतंय. कारण लेस्टरमधील एका मैदानाला माझ्या नावावर ठेवले जात आहे. लीसेस्टरमध्ये खेळासाठी प्रचंड पाठिंबा आहे. माझ्यासाठी हा खरोखरच मोठा सन्मान आहे.’ त्याचवेळी कीथ वाझ म्हणाले, ‘त्यांचा सन्मान होतोय यात आनंद आहे. गावसकर हे जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. ते केवळ लिटल मास्टरच नाही तर या खेळाचा महान मास्टर देखील आहे.’

हायलाईट्स

  1. आज लेस्टर क्रिकेट मैदानाचं नाव बदलण्यात येणार आहे
  2. लीसेस्टर क्रिकेट मैदानाचं नाव बदलण्याची मोहीम भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ यांनी सुरू केली
  3. त्यांनी दीर्घकाळ लीसेस्टरचे प्रतिनिधित्व केलंय
  4. इंग्लंडमधील एखाद्या स्टेडियमला ​​भारतीय क्रिकेटपटूचं नाव देण्याची ही पहिलीच वेळ
  5. अमेरिकेतील केंटकी येथील एका मैदानाचे नाव ‘सुनील गावस्कर फील्ड’ आहे
  6. कीथ वाझ म्हणाले, ‘त्यांचा सन्मान होतोय यात आनंद आहे.

सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम

गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले भारतीय खेळाडू आहे. कसोटीत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्यांचा विक्रम सचिन तेंडुलकरनं मोडला. गावस्कर यांनी भारतासाठी एकूण 125 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 10122 धावा निघाल्या. कसोटीत त्याची सरासरी 51.12 आहे. गावसकर यांनी 108 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3092 धावा केल्या.

दरम्यान, सुनील गावस्कर यांचा सन्मान होतोय. हे भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.