AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरसीबीला जमलं नाही..! आयपीएल स्पर्धेतील 12 सामन्यात सनरायझर्स हैदराबादची विक्रमी कामगिरी

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आपला शेवटचा साखळी फेरीचा सामना आरसीबीविरुद्ध खेळला. हा सामना हैदराबादने 55 धावांनी जिंकला. पण टॉप 2 मध्ये काही स्थान मिळालं. पण एक विक्रम अबाधित राखण्यात यश मिळालं. हा विक्रम मोडणं आरसीबीलाही जमलं नाही.

आरसीबीला जमलं नाही..! आयपीएल स्पर्धेतील 12 सामन्यात सनरायझर्स हैदराबादची विक्रमी कामगिरी
आरसीबीला जमलं नाही..! आयपीएल स्पर्धेतील 12 सामन्यात सनरायझर्स हैदराबादची विक्रमी कामगिरी Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 23, 2026 | 4:27 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील जेतेपद कोण मिळवणार याची उत्सुकता वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. तर 24 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर चौथा संघ कोण ते कळेल? सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला पराभूत करून 18 गुण कमावले आहेत. पण नेट रनरेटचं गणित चुकल्याने तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागले आहे. त्यामुळे क्वॉलिफायर 1 मध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं. आरसीबीला पराभूत करूनही तसा उपयोग झाला नाही. पण हैदराबादने हा सामना जिंकून आपला अभेद्य विक्रम कायम ठेवला आहे. हा विक्रम मोडणं आरसीबीलाही जमलं नाही.

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 255 धावांचा डोंगर उभा केला. या धावा रोखायचं तर होत्या, पण विजय किमान 90 धावांनी हवा होता. पण तसं झालं नाही आरसीबीने 200 धावा केल्या आणि सनरायझर्स हैदराबादने 55 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे टॉप 2 चं गणित चुकलं. या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे फारसे नुकसान झाले नाही. पण सनरायझर्स हैदराबादने एक विक्रम कायम राखला आहे. हा विक्रम म्हणजे, 220 पेक्षा जास्त धावा करूनही कधीही न हरणे.

रेकॉर्डनुसार, सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 12 वेळा 220 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण प्रत्येक वेळी या धावा वाचवण्यात यश मिळालं आहे. म्हणजेच आतापर्यंत 12 सामन्यात अशी कामगिरी केली आणि सर्वच्या सर्व सामने जिंकले. त्यामुळे या धावसंख्येसोबत 12-0 असा रेकॉर्ड आहे.

एका पर्वात सर्वाधिक 200 धावांचा विक्रम

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने या पर्वात नवव्यांदा एका डावात 200 धावांचा पल्ला ओलांडला आहे. हा आयपीएलमधील एक मोठा विक्रम आहे. सनरायझर्स हैदराबादव्यतिरिक्त पंजाब किंग्सने (2025 आणि 2026), आरसीबीने (2026) आणि गुजरात टायटन्सने (2025) मध्ये ही कामगिरी आठ वेळा केली आहे. पण या तीन संघांना मागे टाकत हैदराबादने ही कामगिरी नऊ वेळा केली आहे. आता या विक्रमाची बरोबरी आणि पुढे जाण्याची संधी पंजाब किंग्स आणि आरसीबी या संघांना आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...