AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kane Williamson IPL 2022: SRH ला झटका, कॅप्टन केन विल्यमसन मायदेशी रवाना, काय आहे कारण?

Kane Williamson IPL 2022: लीग स्टेजमध्ये हैदराबादचा शेवटचा सामना बाकी असताना केन विलियमसन मायदेशी निघाला आहे. तुम्ही म्हणाल, त्याचं फ्रेंचायजीसोबत काही बिनसलय का? कारण स्वत: विलियमसन या सीजनमध्ये फॉर्ममध्ये नाहीय.

Kane Williamson IPL 2022: SRH ला झटका, कॅप्टन केन विल्यमसन मायदेशी रवाना, काय आहे कारण?
SRH captain Kane Williamson Image Credit source: PTI
| Updated on: May 18, 2022 | 12:46 PM
Share

मुंबई: IPL 2022 स्पर्धा लीग स्टेजच्या शेवटच्या टप्प्यात असताना सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) मायदेशी निघाला आहे. कालच मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला होता. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना हैदराबादसाठी खूप महत्त्वाचा होता. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून रहाण्यासाठी हैदराबादला विजय आवश्यक होता. लीग स्टेजमध्ये हैदराबादचा शेवटचा सामना बाकी असताना केन विल्यमसन मायदेशी निघाला आहे. तुम्ही म्हणाल, त्याचं फ्रेंचायजीसोबत काही बिनसलय का? कारण स्वत: विल्यमसन या सीजनमध्ये फॉर्ममध्ये नाहीय. कालच्या सामन्यातही तो स्वत: खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यामुळे असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण होऊ शकतात. पण असं काही नाहीय. केन विल्यमसन लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. तिच्या प्रसुतीच्यावेळी पिता, पती म्हणून तिथे उपस्थित रहाण आवश्यक आहे. म्हणून केन विल्यमसन न्यूझीलंडला निघाला आहे. सनरायजर्स हैदराबादने टि्वट करुन ही माहिती दिली आहे.

“कुटुंबात एक नवीन सदस्य येणार असल्याने आमचा कॅप्टन केन विल्यमसन न्यूझीलंडला मायदेशी निघाला आहे. सनरायजर्स कॅम्पकडून केन विल्यमसन  आणि त्याच्या पत्नीला सुरक्षित प्रसुतीसाठी शुभेच्छा. त्यांना भरपूर आनंद मिळो” असं सनरायजर्स हैदराबादने आपल्या टि्वट मध्ये लिहिलं आहे.

प्लेऑफच्या शर्यतीत SRH चा संघ टिकून, पण…

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदराबादचा संघ यंदाच्या सीजनमध्ये विशेष काही करु शकलेला नाही. 13 पैकी त्यांनी फक्त 6 सामने जिंकलेत. प्लेऑफच्या शर्यतीत SRH चा संघ टिकून असला, तरी त्यांचा पुढचा मार्ग सोपा नाहीय. त्यांना लीगमधला अखेरचा सामना जिंकावाच लागेल व अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहाव लागेल.

IPL 2022 मध्ये विल्यमसन फ्लॉप

केन विल्यमसनचा आयपीएलमधल्या चांगल्या फलंदाजांमध्ये समावेश होतो. चांगल्या इनिंग खेळणे ही विल्यमसनची ओळख आहे. पण या सीजनमध्ये विल्यमसन स्वत: फ्लॉप आहे. विल्यमसनने 13 सामन्यात 19.64 च्या सरासरीने फक्त 216 धावा केल्यात. विल्यमसनने फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे. 93.51 त्याचा स्ट्राइक रेट आहे.

याआधी विल्यमसनने खराब कामगिरी कधी केली होती?

आयपीएलमध्ये विल्यमसनने 75 डावात 36 च्या सरासरीने 2101 धावा केल्या आहेत. पण यावर्षी त्याने खूपच खराब कामगिरी केलीय. याआधी 2016 मध्ये त्याने खराब कामगिरी केली होती. त्याने 6 सामन्यात 20.66 च्या सरासरीने फक्त 124 धावा केल्या होत्या.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.