AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, Points Table : प्लेऑफची शर्यत अधिक रोमांचक, पॉईंट्स टेबलमध्ये तुमचा संघ कोणत्या स्थानी, जाणून घ्या…

तेरा सामन्यांत सहा विजय मिळवून हैदराबादचे आता बारा गुण झाले असून त्यांनी या बाबतीत पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सची बरोबरी केली आहे.

IPL 2022, Points Table : प्लेऑफची शर्यत अधिक रोमांचक, पॉईंट्स टेबलमध्ये तुमचा संघ कोणत्या स्थानी, जाणून घ्या...
हैदराबादचा तेरा सामन्यातील हा सहावा विजय असून त्यांचे बारा गुण झाले आहेत.Image Credit source: social
| Updated on: May 18, 2022 | 7:31 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांना शेवट्या दोन ठिकाणी रहावं लागेल असं दिसतंय. दोन्ही संघांना दहाव्या स्थानापासून निसटण्याची शेवटची आशा सनरायजर्स हैदराबाद होती, जो सलग पाच सामने गमावल्यानंतर आठव्या स्थानावर घसरली होता. पण हैदराबादने याउलट प्लेऑफच्या शर्यतीत आपली दावेदारी पुनरुज्जीवित करत अंतिम चारची शर्यत अधिक रोमांचक केली. मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायजर्सने मुंबई इंडियन्सचा तीन धावांच्या फार कमी फरकानं त्यांच्या घरच्या मैदानावरच पराभव करून पराभवाची साखळी तोडण्यात यश मिळविले. मात्र, तरीही संघ आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे अंतिम चारची शर्यत अधिक रोमांचक केली. आता क्रिकेटप्रेमींना देखील सामने पहायला मजा येतेय.

गेल्या पाच सामन्यांतील सलग पराभवांमुळे हैदराबाद दिल्ली, बंगळुरू, पंजाब आणि कोलकाता यांच्याविरुद्ध प्लेऑफच्या चर्चेत सतत मागे पडत होते. अशा परिस्थितीत संघाला शेवटचा जोर देण्याची गरज होती. अशा स्थितीत ‘करा किंवा मरा’ असा प्रसंग आला. तेव्हा केन विल्यमसनच्या संघाने प्रत्येक आघाडीवर चांगली कामगिरी केली. मात्र, त्याच्यासमोर मुंबई इंडियन्स होती. जी यंदाच्या मोसमात खराब कामगिरीमुळे आधीच बाद झाली होती. पण गेल्या काही सामन्यांमध्ये ती चांगली स्थितीत असल्याचे दिसत आहे.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

जिंकूनही परिस्थिती बदलली नाही

तेरा सामन्यांत सहा विजय मिळवून हैदराबादचे आता बारा गुण झाले असून त्यांनी या बाबतीत पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सची बरोबरी केली आहे. असं असूनही हा संघ निव्वळ धावगतीच्या दरात खूप मगा पडला आहे. मुंबईचा विचार केल्यास रोहित शर्माच्या संघाचा तेरा सामन्यांमधला हा दहावा पराभव आहे. जी आयपीएलच्या इतिहासातील मुंबईची सर्वात खराब कामगिरी आहे. या पराभवानंतर त्यांनी दहा स्थानावर जाण्याची शक्यता जवळपास संपुषटात आली आहे. हा संघ हंगामातील सर्वात खराब संघ असल्याचं दिसतं आहे.

प्लेऑफसाठी काय आवश्यक?

आता हैदराबाच्या प्लेऑफच्या शक्तांबद्दल बोलायचं झालं तर ते इतर संघांवर अवलंबून आहे. कारण, हैदराबाद शेवटचा सामनाही या मोसमातील शेवटच्या साखळी सामना आहे. यामध्ये त्यांची 22 मे रोजी पंजाब किंग्स संघासोबत सामना होईल. जे बारा गुणांसह सातव्या स्थानावर आहे. मात्र, याच्या एक दिवस आधी दिल्ली आणि मुंबई सामन्याला निकालाने संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होऊ शकते. दिल्ली जिंकल्यास प्लेऑफमध्ये पोहोचेल. ती हरली आणि त्याआधी बंगलुरूनेही गुजरातविरुद्धचा शेवटचा सामना गमावला, तरत हैदराबाद आणि पंजाबला शेवटच्या दिवशी आशा असतील.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.