Birthday Special : गल्लीत क्रिकेट खेळायचा, आज फलंदाजीने वादळ उठवतो, विश्वचषकाच्या संघात भारताचा हुकुमी एक्का

भारतीय क्रिकेट संघात सध्या बरेच युवा खेळाडू आहेत. पण या खेळाडूने सततच्या अप्रतिम प्रदर्शनामुळे सर्वांचीच मनं जिंकली आहेत. आधी आयपीएल गाजवल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी हा खेळाडू सज्ज झाला आहे.

Birthday Special : गल्लीत क्रिकेट खेळायचा, आज फलंदाजीने वादळ उठवतो, विश्वचषकाच्या संघात भारताचा हुकुमी एक्का
सूर्यकुमार यादव

मुंबई: अथक परिश्रम, पराभूत न होण्याचा निश्चय, जिंकण्याची जिद्द अशा साऱ्या गुणांनी अखेर भारतीय संघात स्थान मिळवलेला खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakuamr Yadav). एकेकाळी मुंबईच्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळणारा सूर्यकुमार अर्थात फॅन्सचा लाडका सूर्या आता लवकरच विश्वचषका सारख्या भव्य स्पर्धेत टीम इंडियाकडून खेळणार आहे. आधी आयपीएल गाजवल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यासाठी सज्ज झालेल्या सूर्याचा आज वाढदिवस आहे.

इतर युवा खेळाडूंच्या तुलनेत फार उशीरा सूर्याला संधी मिळाली असली तरी त्याची गोष्ट निराळीच आहे. नुकतंच 30 वर्षाच्या वयात सूर्याला भारतीय संघात स्थान मिळालं. पण केवळ 4 टी20 आणि 3 वनडे सामन्यांतून त्याने स्वत:ला सिद्ध करत टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. सूर्यकुमारचा जन्म 14 सप्टेंबर, 1990 रोजी झाला. त्याचे वडिल अशोक कुमार यादव मूळचे उत्तर प्रदेशचे असून इलेक्ट्रिक इंजीनियर असल्याने मुंबईत स्थायिक होते. अवघ्या 10 वर्षाचा असल्यापासून सूर्या मुंबईतील गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळायचा. त्यानंतर 12 वर्षाचा असताना त्याला एल्फ वेंगसरकर अकादमीत घालण्यात आलं. दिलीप वेंगसरकरांच्या हाताखाली तयार झालेला सूर्या मार्च 2010 मध्ये टी-20 संघातून मुंबईसाठी खेळला. यासोबतच स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण करत 9 महिन्यांतच प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सूर्याने आतापर्यंत 77 प्रथम श्रेणी सामन्यात 5 हजार 326, 101 लिस्ट ए सामन्यात 2 हजार 903 आणि 181 टी-20 सामन्यांत 3 हजार 879 धावा बनवल्या आहेत.

आयपीएलमध्ये पदार्पण

स्थानिक क्रिकेट गाजवत अखेर 2012 मध्ये सूर्याला आयपीएलमधून बुलावा आला. प्रथम  मुंबई इंडियन्स संघात सामिल झालेला सूर्या दोन वर्षांतर म्हणजे 2014 ला कोलकाता नाइट रायडर्समध्ये गेला. त्याठिकाणी फिनिशर म्हणून खेळणारा सूर्याने काही खास खेळी खेळल्या. तो संघाचा उपकर्णधार देखील झाला होता. त्यानंतर 2018 मध्ये सूर्या पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये आला. 3.20 कोटींना त्याला मुंबईने विकत घेतले. त्यानंतर मात्र सूर्याचा खेळ कमालीचा बहरला. 2018 साली 14  सामन्यात  512, 2019 मध्ये 424 आणि 2020 मध्ये 480 धावा करत सूर्याने धावांचा डोंगर रचला.

संघर्षानंतर भारतीय संघात वर्णी

आयपीएल 2020 मध्ये कमाल खेळी केल्यानंतर सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात निवडलं जाईल अशी आशा होती. पण असं झालं नाही त्यामुळे सूर्यासह त्याचे फॅन्स कमालीचे नाराज होते. याचदरम्यान सूर्याचा मुंबई इंडियन्स संघाकडून आरसीबी विरुद्ध मॅच सुरु असताना विराट कोहलीसोबत वादही झाला होता. हा सामना अप्रतिमरित्या संघाला जिंकवून देत सूर्याने विराटला दिलेली ठस्सन चांगलीच गाजली होती. पण त्यानंतर 2021 च्या इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्याची संघात निवड झाली. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवातच षटकाराने करत सूर्याने त्याच्या येण्याची डरकाळी फोडली. नुकताच जुलै 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यातून सूर्यकुमारने वनडे डेब्यू देखील केला. सूर्याने एकदिवसीय क्रिकेटसह टी20 सामन्यातही अर्धशतक ठोकलं आहे. आता त्याची निवड टी20 विश्वचषकासाठी झाली असून तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

हे ही वाचा-

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत सस्पेन्स संपला, BCCI सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य!

IPL 2021: सलामीला येत ‘हे’ धुरंदर उधळतात जलवा, पाहा कोण आहेत हे दिग्गज!

VIDEO: मुंबई इंडियन्सचे दमदार शिलेदार, जीममध्ये सरावात व्यस्त, अर्जून तेंडूलकरचा फिटनेस पाहाच!

(Suryakumar yadav birthday today he just selected in Team india for T20 world Cup)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI