AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs SRH: सूर्यकुमार यादवचा फुसका बार, आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी अवघड जागेचं दुखणं

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने चांगली सुरूवात केली. पण पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवने माती खाल्ली आणि संघ अडचणीत आला.

MI vs SRH: सूर्यकुमार यादवचा फुसका बार, आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी अवघड जागेचं दुखणं
MI vs SRH: सूर्यकुमार यादवचा फुसका बार, आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी अवघड जागेचं दुखणंImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 29, 2026 | 10:13 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला विजयी ट्रॅकवर परतण्याशिवाय पर्याय नाही. आता यापुढे होणारा प्रत्येक सामना जिंकणं भाग आहे. नाही तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाईल. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे प्लेऑफसाठी 16 गुणांचं गणित सोडवायचं तर प्रत्येक सामना जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळे आठव्या सामन्यापासून हार्दिक पांड्याने विजयासाठी प्रयोग सुरू केले आहेत. रोहित शर्माच्या गैरहजेरीत ओपनिंगसाठी नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. रिकल्टन आणि विल जॅक्स यांनी सलामी दिली. या दोघांनी चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. विल जॅक्स 43 धावा करून बाद झाला आणि धावगती वाढण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादववर आली. पण या सामन्यातही त्याने निराशा केली.

मुंबई इंडियन्स संघाची धावसंख्या 93 असताना सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. संघाची स्पर्धेतील स्थिती नाजूक असल्याने त्याच्याकडून अपेक्षा होत्या. त्यात मुंबईचं वानखेडे स्टेडियम हे होमग्राउंड.. असं असूनही त्याला संघासाठी योगदान देता आलं नाही. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा फेल गेला. सूर्यकुमार यादवने रिकल्टनसोबत 8 चेंडूत फक्त 17 धावांची भागीदारी केली आणि बाद झाला. सूर्यकुमार यादवने 5 चेंडूंचा सामना करत एक चौकारासह 5 धावा केल्या. इशान मलिंगाच्या गोलंदाजीवर पूल मारताना चुकला आणि अभिषेक शर्माने त्याचा झेल पकडला.

आयपीएल स्पर्धेत सूर्यकुमार यादवने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 32 चेंडूत 51 धावा, चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 22 चेंडूत 36, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18 चेंडूत 33 धावा, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 13 चेंडूत 16 धावा, गुजरात टायटन्सविरुद्ध 12 चेंडूत 15, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 9 चेंडूत 5, तर पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलता आलं नाही. सूर्यकुमार यादवचा फ्लॉप शो सुरूच आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्याला खातं खोलता आलं नव्हतं. त्यामुळे त्याची टीम इंडियातील स्थान धोक्यात आलं आहे. त्याच्या कर्णधारपद असल्याने टी20 संघातून काढणं कठीण आहे. पण कर्णधार बदलला तर मात्र संघातून पत्ता कट होईल.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?