AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद धोक्यात! टीम इंडियातून आऊट होण्याची भीती? शेवटची संधी आणि…

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2026 टी20 वर्ल्डकप जिंकला. पण या स्पर्धेत त्याचं नेतृत्व सोडलं तर कामगिरी सुमार राहिली. अंतिम सामन्यातही शून्यावर बाद झाला होता. आता त्याचं कर्णधारपद आणि टीम इंडियातील स्थान अडचणीत आहे.

सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद धोक्यात! टीम इंडियातून आऊट होण्याची भीती? शेवटची संधी आणि...
सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद धोक्यात! टीम इंडियातून आऊट होण्याची भीती? शेवटची संधी आणि...Image Credit source: BCCI
| Updated on: Apr 14, 2026 | 5:27 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असून मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीला काही चमक येताना दिसत नाही. गेल्या वर्षभरापासून त्याची कामगिरी सुमार राहिली आहे. टी20 वर्ल्डकप, मालिका असो की आयपीएल स्पर्धा सूर्यकुमारचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने आशिया कप आणि टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेवर नाव कोरलं. पण त्याचा फॉर्ममुळे त्याचं कर्णधारपद आणि टीम इंडियातील जागा अडचणीत आली आहे. त्याचा ढासळता फॉर्म पाहता निवड समितीच्या रडारवर आला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी दुसरा पर्याय शोधला जात असल्याची चर्चा रंगली आहे. 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. पण आता त्याला संघात सहभागी करणार की नाही यावर शंका आहे.

सूर्यकुमार यादवसाठी करो या मरोची लढाई

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर सूर्यकुमार यादवची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात त्याच्या फलंदाजी आणि कर्णधारपदाची पारख होईल. त्यानंतर 2028 ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार की नाही हे ठरवलं जाईल. वर्ल्डकप स्पर्धाच काय याच वर्षी टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड येथे होणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला मेहनत घ्यावी लागेल. विशेष म्हणजे सर्वकाही सूर्यकुमार यादवच्या विरोधात आहे. पण हेड कोच गंभीरने त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. गंभीरचा कार्यकाळही 2028 पर्यंत वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे सूर्यकुमार यादव संघात राहतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. दरम्यान, 2028 पर्यंत सूर्यकुमार यादव 38 वर्षांचा होईल.

सूर्यकुमार यादव फलंदाजी फेल गेला तर…

बीसीसीआयच्या सू्त्रांनी सांगितलं की, ‘अर्थातच, सूर्य सध्या संघाचे कर्णधारपद भूषवत आहे, पण त्याला फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. तो इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये नक्कीच कर्णधारपद भूषवेल, पण त्यानंतर 2028 पर्यंत त्याचे खेळणे त्याच्या कामगिरीवर अवलंबून असेल.’ त्यामुळे सूर्यकुमारचं भवितव्य पूर्णपणे या दोन दौऱ्यातील मालिकेवर अवलंबून असणार आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत फेल गेला तर शुबमन गिलचा विचार केला जाऊ शकतो.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री