AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T-20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या पराभवासह ‘त्या’ चॅम्पियनल सगळेच विसरले, युवराज सिंहने जगाला करून दिली आठवण

ind vs aus t20 world cup : टी-20 वर्ल्ड कपमधील टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील झालेल्या सामन्यामध्ये रोहितसेनेने विजय मिळवला. त्यानंतर अफगाणिस्तान संघाने मिळालेल्या संधीचं सोनं करत सेमी फायनलमध्ये स्थान मिळवलं. हा पराभव कांगारूंच्या जिव्हारी लागला, या सामन्यानंतर त्यांचा एका चॅम्पियन खेळाडूने निवृत्तीही जाहीर केलेली. या खेळाडूबाबत जास्त चर्चा झाली नाही पण युवराज सिंहने सर्वांना आठवण करून दिली आहे.

T-20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या पराभवासह 'त्या' चॅम्पियनल सगळेच विसरले, युवराज सिंहने जगाला करून दिली आठवण
| Updated on: Jun 26, 2024 | 5:18 PM
Share

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा उलटफेर म्हणजे ऑस्ट्रेलिया टीम सेमी फायनल खेळत नाहीये. सुपर-8 मधील एका पराभवामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला त्यानंतर सलग झालेल्या दुसऱ्या पराभवामुळे यंदा ते सेमी फायनल गाठू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियासारखा तगडा संघ सेमी फायनलबाहेर असल्याने क्रिकेट विश्वात याची जोरदार चर्चा आहे. टीम इंडियाचा पराभव केला असता तर त्यांना संधी होती पण त्यांच्या पदरी अपयश आलं. टीम इंडियाने आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर कांगारूंना रोखलं आणि वन डे वर्ल्ड कपमधील फायनलचा बदला पूर्ण केला. या सगळ्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार खेलाडू डेव्हिड वॉर्नर याने निवृत्ती घेतली त्याच जास्त कोणती चर्चा झाली नाही. मात्र टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह याने वॉर्नरच्या निवृत्तीनंतर एक ट्विट करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाला युवराज सिंह?

कोणालाही शांतपणे निरोप घ्यायला आवडत नाही, पण तो जीवनाचा खेळ आहे मित्रा.” डेव्हिड वॉर्नर, अविश्वसनीय कारकिर्दीसाठी तुझे अभिनंदन. मैदानावर चौकार मारण्यापासून ते बॉलीवूडचे मुव्ह आणि डायलॉग बोलण्यापर्यंत, हे सर्व तू वॉर्नर शैलीत केलेस. एक खतरनाक फलंदाज, एक जीवंत टीममेट आणि मैदानावर आणि मैदानाबाहेर खरा मनोरंजन करणारा. मित्रा तुझ्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करताना खरोखरच आनंद झाला. असेच तू चांगले करत राहा. आपल्या कुटुंबासह चांगला वेळ घालव, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे.

डेव्हिड वॉर्नर भारतातही प्रसिद्ध आहे. पुष्पा चित्रपटामधील दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनसारखी तो स्टेप भर सामन्यात करतो. आयपीएल किंवा भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये फिल्डिंग करताना चाहत्यांचं मनोरंजन करतो. आता हा चॅम्पियन खेळाडू क्रिकेटच्या मैदानात दिसणार नाही.  वॉर्नरने आपल्या संघाला अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून दिले आहेत. आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्त्वात वॉर्नरने सनरायजर्स हैदराबाद संघाला विजय मिळवून दिलेला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.