AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE : आयर्लंडविरुद्ध सुनिल गावस्कर यांनी प्लेइंग इलेव्हन निवडली, या खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. मात्र सामना होत असलेल्या मैदानातील मागच्या सामन्यातील निकाल पाहता धाकधूक वाढली आहे. आयपीएलसारखं चौकार षटकार मारणं खूपच कठीण झाल्याचं दिसत आहे. असं असताना माजी क्रिकेटपटून यांनी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग 11 निवडली आहे.

IND vs IRE : आयर्लंडविरुद्ध सुनिल गावस्कर यांनी प्लेइंग इलेव्हन निवडली, या खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
| Updated on: Jun 04, 2024 | 2:45 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिलाच सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. भारतासमोर दुबळा आयर्लंड संघ असला तरी त्याला कमी लेखून चालणार नाही. कारण न्यूयॉर्कमधील खेळपट्टी आणि तिथल्या मागच्या सामन्यांचा निकाल पाहता हा खेळ वाटतो तितका सोपा नाही. न्यूयॉर्कमधील नसाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी एक गूढ आहे. या खेळपट्टी मोठी धावसंख्या होणं कठीण दिसत आहे. असं असताना सराव सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला 60 धावांनी पराभूत केलं आहे. यावेळी 15 पैकी 12 खेळाडू खेळले होते. त्यामुळे आता राहुल द्रविड आणि रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला जागा देणार? हा प्रश्न समोर आला आहे. सराव सामन्यात विराट कोहली खेळला नव्हता. तो आता प्लेइंग 11 चा भाग असेल यात शंका नाही. या सर्व पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी प्लेइंग इलेव्हन जारी केली आहे.

“मला टीम निवडणं खरंच आवडणारं नाही, कारण मी सर्वांकडून हवा तसा समाधानी नाही”, असं सुनील गावस्कर याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं. “प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणचातरी आवडता प्लेयर निवडला जाणार नाही. मी आयर्लंडविरुद्ध प्लेइंग 11 निवडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.”, असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं.

“रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.”, सुनिल गावस्कर यांनी ही प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. ही प्लेइंग इलेव्हन निवडण्याचं कारण मात्र त्यांनी सांगितलं नाही. पण रोहित शर्मासोबत विराट कोहलीने ओपनिंग उतरावं असा सल्ला त्यांनी दिला आहे. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालला इतरांनी डावललं असताना सुनिल गावस्कर यांनी त्याला तिसऱ्या स्थानावर उतरण्यास पसंती दिली.

सुनिल गावस्कर यांनी डावखुरा अर्शदीप सिंग याला प्लेइंग इलेव्हनमधून डावललं आहे. सराव सामन्यात अर्शदीप सिंगने तीन षटकं टाकत 12 धावा देत 2 गडी बाद केले होते. तसेच सराव सामन्यात संजू सॅमसन फेल झाल्याने त्याची निवड झाली नाही हे तितकंच खरं आहे. आयर्लंडविरुद्ध निवडलेली प्लेइंग इलेव्हनच पुढच्या सामन्यात कायम दिसली तर आश्चर्य वाटायला नको. भारताच्या गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहेत.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.