IND vs PAK Toss: पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, टीम इंडिया विरुद्ध बॅटिंग की फिल्डिंग?
India vs Pakistan Toss T20 World Cup 2024: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या 2 चीर प्रतिद्वंदींमधील सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात मोठी गर्दी केली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 मोहिमेतील आपला दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा बहुप्रतिक्षित महामुकाबला होत आहे, ज्याची साऱ्या क्रिकेट विश्वाला गेल्या काही महिन्यांपासून प्रतिक्षा होती. सामन्याचं आयोजन हे नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे करण्यात आलं आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात आणि 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षि होतं. मात्र पावसामुळे टॉस आणि सामन्याला 30 मिनिटांनी विलंब झाला आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजता मिनिटांनी टॉस झाला. पाकिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन बाबर आझम याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिले बॅटिंग करणार आहे.
आकडेवारी कुणाच्या बाजूने?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये एकूण 12 वेळा आमनेसामने आले आहेत. टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला एकूण 12 पैकी 8 सामन्यात पराभूत करत विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला केवळ 3 वेळा विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर एक सामना बरोबरीत राहिला, जो टीम इंडियाने जिंकला. टीम इंडियाने अशाप्रकारे एकूण 9 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार टीम इंडियाच सरस आहे. मात्र क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
पाकिस्तान-टीम इंडिया दोघांचा दुसरा सामना
दरम्यान टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघांचा हा या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सामना आहे. दोन्ही संघ ए ग्रुपमध्ये आहेत. टीम इंडियाने 5 जून रोजी आयर्लंडवर मात करत विजयी सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला नवख्या आणि यजमान असलेल्या यूएसएकडून सुपर ओव्हरमध्ये पराभूत व्हावं लागलं. अशाप्रकारे या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या टीम इंडियाची विजयाने तर पाकिस्तानची पराभवाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा पाकिस्तानला पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर पाकिस्तान टीम इंडियावर मात करत विजयाचं खातं उघडण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे.
पाकिस्तान विन द टॉस
It’s 🇮🇳 🆚 🇵🇰 in New York! 🔥
Babar Azam wins the toss and opts to field first against India.#T20WorldCup | #INDvPAK | 📝: https://t.co/6nOq3vU98z pic.twitter.com/sHYekdoLqe
— ICC (@ICC) June 9, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.
