बांगलादेशात युएन का खोदत आहे मुसलमानांच्या कबरी ? शेख हसीना यांच्याशी काय कनेक्शन?
Bangladesh News: आपला शेजारील देश बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर या देशात मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतिरिम सरकार सत्तेवर आले असून या सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या खटला दाखल करुन मृत्यूदंड सुनावला आहे.

बांगलादेशातील युनुस यांचे अंतरिम सरकार संयुक्त राष्ट्र संघाच्या मदतीने जुन्या कबरींचे खोदकाम करीत आहेत. याची सुरुवात ढाकातील रायरबाजार कब्रस्थानपासून सुरु झाली आहे. स्थानिक प्रशासनानुसार या कबरीचे खोदकाम त्यातील हाडांचा फोरेन्सिक रिपोर्ट तयार केला जाणार आहे. त्यानंतर हा फोरेन्सिक अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे.जर युनुस यांचे सरकार त्यांच्या हेतूमध्ये यशस्वी झाले. तर येत्या काळात शेख हसीना यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
न्यूज एजन्सी एएफपीच्याच्या बातमीनुसार बांगलादेशात फोरेन्सिक अहवाल तयार करण्यासाठी अर्जेंटीना येथे फोरेन्सिक मानवसंशोधक लुईस फोंडेब्रायडर यांचा सल्ला घेतला जाता. लुईस यांनी अनेक देशात हे काम याआधी चांगल्या प्रकारे केली आहे.
कबर खोदण्यासाठी ४ टीमची स्थापना
स्थानिक मीडियाच्या मते ढाका स्थिक कबरींचे खोदकामासाठी चार मेडिकल कॉलेजच्या फोरेन्सिक तज्ज्ञांच्या विषेश टीमची वेग-वेगळी तैनाती केली आहे. लुईस या चार टीमचे मॉनिटरींग करत आहेत. लुईस यांना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समिती OHCHR सोबत एका करारांतर्गत मदत करण्यासाठी सोबत घेतले आहे.
फोंडेब्रायडर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ही प्रक्रीया जटील आणि अनोखी आहे.सहजपणे आम्ही मृतदेहांची ओळख करु शकत नाही. हाडे पूर्णपणे विघटीत झालेली असतील. तरीही आम्ही लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करणार आहोत. याला आखणीन वेळ लागू शकतो.
सरकारचे म्हणणे आहे की खोदून बाहेर काढलेल्या मृतदेहांना पुन्हा धार्मिक रितीरिवाजानुसार त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार पुन्हा दफन केले जाणार आहे. सरकारने कबरीच्या खोदकामातही आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्यात येईल असे म्हटले आहे.
बांगलादेशात का होत आहे कबरींचे खोदकाम ?
बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे म्हणणे आहे की शेख हसीना यांच्या कार्यकाळात शेकडो लोकांना गुपचूपपणे ठार केले असून त्यांना सामुहिक कबरीत दफन केले आहे. ज्या कबरींचे खोदकाम केले जात आहे तेथे एकसाथ १४० लोकांना दफन केल्याचा दावा केला जात आहे.
बांग्लादेश सरकारच्या मते हसीना यांच्या कार्यकाळात पोलिस आणि सैन्याने १४०० लोकांची हत्या केली होती. हसीना यांच्या या हत्यांचा खटला चालवला जात आहे. अलिकडेच त्यांना या केसमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. शेख हसीना २००८ ते २०२४ पर्यंत बांगलादेशाच्या पंतप्रधान पदावर होत्या.
