AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2024 : बोलला नवीन-उल-हक, किंमत चुकवली दुसऱ्याने, पूरनने 6 बॉलमध्ये चोपल्या 36 धावा, VIDEO

T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनने आपला आक्रमक अंदाज दाखवला. त्याने एका ओव्हरमध्ये 36 धावा वसूल केल्या. वेस्ट इंडिजच्या इनिंगमधील ती चौथी ओव्हर होती. पूरनच्या या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजच्या 4 ओव्हरमध्ये 73 धावा झाल्या. महत्त्वाच म्हणजे विराटला नडणारा खेळाडू पूरनला काहीतरी बोलला.

T20 WC 2024 :  बोलला नवीन-उल-हक, किंमत चुकवली दुसऱ्याने, पूरनने 6 बॉलमध्ये चोपल्या 36 धावा, VIDEO
nicholas pooran Image Credit source: PTI
| Updated on: Jun 18, 2024 | 9:57 AM
Share

वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीची सगळ्यांनाच कल्पना आहे. जर, त्याचा दिवस असेल, तर तो काहीही करु शकतो. अशा फलंदाजाला तुम्ही छेडलत तर त्या गोलंदाजाची धुलाई होण स्वाभाविक आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या T20 वर्ल्ड कप 2024 च्या शेवटच्या ग्रुप मॅचमध्ये हेच दिसून आलं. ब्रँडन किंगच्या रुपाने वेस्ट इंडिजचा पहिला विकेट पडला. त्यानंतर पूरन फलंदाजीसाठी मैदानात उतरला. क्रीजवर आल्यानंतर नवीन-उल-हक पूरनला काहीतरी बोलला. पूरन लगेच त्यावर रिएक्ट झाला नाही. पण नवीन-उल-हकच्या बोलण्याची किंमत अजमतुल्लाह ओमरजईला चुकवावी लागली.

निकोलस पूरनने अजमतुल्लाह ओमरजईच्या एका ओव्हरमध्ये 36 धावा चोपल्या. वेस्ट इंडिजच्या इनिंगमधील ही चौथी ओव्हर होती. पूरनने ओमरजईच्या पहिल्या चेंडूवर सिक्स मारला. दुसरा चेंड़ू नो बॉल होता. पूरनने त्यावर चौकारासह 5 धावा वसूल केल्या. ओमरजईने त्यानंतर वाईड चेंडूवर 5 धावा दिल्या. त्यानंतर ओमरजईच्या यॉर्करवर एकही धाव निघाली नाही. त्यानंतर पुढच्या चार चेंडूवर पूरनने 2 सिक्स आणि 2 फोर मारत 20 धावा वसूल केल्या. अशा प्रकारे ओमरजईच्या एका ओव्हरमध्ये 36 रन्स वसूल केल्या.

4 ओव्हरमध्येच झाल्या इतक्या धावा

पूरनच्या या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजच्या 4 ओव्हरमध्ये 73 धावा झाल्या. निकोलस पूरनच्या या बॅटिंगमुळे राशिद खानला गोलंदाजीत बदल करावे लागले. राशिद खानने स्वत: चेंडू हाती घेतला. त्याने सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा दिल्या.

पूरन-नवीन-उल-हक एकाच टीमकडून खेळतात

निकोलस पूरन आधीच आक्रमक खेळायच हे ठरवून आलेला की, नवीन-उल-हक बोलल्यानंतर त्याने त्याचं मन बदलल हे माहित नाही. पण मैदानावर जे दिसलं, त्यामुळे फॅन्सचे खूप एंटरटेनमेंट झालं. निकोलस पूरन आणि नवीन-उल-हक दोघे आयपीएलमध्ये LSG कडून खेळतात.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

जय-पराजयचा सुपर-8 वर काय परिणाम?

वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचा T20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 फेरीवर काही परिणाम होणार नाहीय. कारण या दोन्ही टीम्स सुपर-8 मध्ये आधीच पोहोचल्या आहेत. पण इथे विजय मिळवून ग्रुप सी मध्ये टॉपवर राहण्याच समाधान मिळेल.

'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.