AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी विचार केला नव्हता निवृत्ती घेणार, पण…”, रोहित शर्मा याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर गौतम गंभीरची चर्चा का?

rohit sharma and gautam gambhir: मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. ते एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळतील. तसेच देश आणि संघाच्या यशात त्यांचे योगदान यापुढेही कायम राहणार आहे. सध्या संपूर्ण देश खूप आनंदी आहे. मी रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो.

मी विचार केला नव्हता निवृत्ती घेणार, पण..., रोहित शर्मा याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर गौतम गंभीरची चर्चा का?
rohit sharma press conference
| Updated on: Jul 01, 2024 | 10:07 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाने टी 20 विश्वचषक जिंकला. देशातील क्रिकेटप्रेमी विश्वचषक स्पर्धेतील विजयाचा आनंद साजरा करत असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांना धक्का दिला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वर्ल्ड कपमधील विजयानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळे या खेळाडूंच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. आता रोहित शर्मा याने अचानक निवृत्ती का घेतली? त्याबाबत त्यानेच स्वत: स्पष्टीकरण दिले आहे. रोहित शर्मा याने म्हटले आहे की, “मी निवृत्त होण्याचा विचार केला नव्हता. परंतु परिस्थिती अशी आली की मला निवृत्त होण्याची हिच योग्य वेळ आहे.” आता रोहित शर्मा याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय म्हणतात युजर

रोहित शर्मा याचा निवृत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. रोहित शर्मा याचे फॅन आता गौतम गंभीरचा संदर्भ जोडत आहे. गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. त्यामुळे रोहित शर्मा याचा फॅन असलेल्या एका युजरने म्हटले आहे की, रोहित शर्माला गंभीर टारगेट करत होते. त्यामुळे रोहित शर्मा याने स्वत:च निवृत्तीचा विचार केला. परंतु अनेक युजर हा दावा फेटाळला आहे.

गंभीरचा त्या निर्णयाशी संबंध नाही

एका युजरने लिहिले आहे की, “नॉनसेन्स!” गंभीरचा त्या निर्णयाशी काहीही संबंध नाही. रोहित शर्मा याने त्याचा जुना सहकारी विराट निवृत्त झाल्याचे पाहिले आणि त्याला वाटले की चॅम्पियन म्हणून बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ आहे. T20 मध्ये अजून काही साध्य करायचे नाही, कारण नुकताच विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडिया एका नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे, जो राहुल द्रविडची जागा घेईल. यासाठी गौतम गंभीरने एक मुलाखतही दिली आहे.

गौतम गंभीर काय म्हणतो…

रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना गौतम गंभीर याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीसंदर्भात शुभेच्छा दिल्या.

गौतम गंभीर म्हणाला, “मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. ते एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळतील. तसेच देश आणि संघाच्या यशात त्यांचे योगदान यापुढेही कायम राहणार आहे. सध्या संपूर्ण देश खूप आनंदी आहे. मी रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो.”

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.