AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit-Shubman: शुबमन गिल-रोहित शर्मा यांच्यात राडा? नक्की काय झालं?

Rohit Sharma And Shubman Gill: शुबमन गिल याचं टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यासोबत वाजल्याचं म्हटलं जात आहे. नक्की काय कारण?

Rohit-Shubman: शुबमन गिल-रोहित शर्मा यांच्यात राडा? नक्की काय झालं?
rohit sharma and shubman gill
| Updated on: Jun 15, 2024 | 5:52 PM
Share

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सलग 3 सामने जिंकून सुपर 8 मध्ये धडक दिली आहे. टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसएस या तिन्ही संघांचा पराभव केला. त्यानंतर आता टीम इंडिया साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना हा कॅनडा विरुद्ध फ्लोरिडा येथे खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघातील राखीव खेळाडू शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित यांच्यात वाजल्याचं म्हटलं जात आहे.

कॅनडा विरुद्धच्या सामन्यानंतर शुबमन गिल आणि आवेश खान हे 2 राखीव खेळाडू मायदेशी परतणार असल्याचं वृत्त होतं. मात्र आता शुबमनचं मायदेशी परतण्यामागचं कारण दुसरंच काही असल्याची कुजबुज सुरु झाली आहे. साधारणपणे मुख्य संघांतील खेळाडूंना दुखापत झाल्यास त्यांच्या जागी राखीव खेळाडूंना संधी दिली जाते. सुदैवाने आतापर्यंत टीम इंडियाच्या मुख्य संघातील एकाही खेळाडूला दुखापत झालेली नाही. त्यामुळे शुबमन आणि आवेश माघारी परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र शुबमनने केलेल्या शिस्तभंगामुळे त्याला माघारी पाठवलं असल्याची चर्चा आहे.

शुबमनचं काय चुकलं?

शुबमनला मायदेशी पाठवण्यामागे त्याचं गैरवर्तन असल्याचं म्हटलं जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमनला शिस्तभंगामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कारण शुबमनने टीम इंडियासोबत यूएसएमध्ये प्रवास केला नाही. इतकंच नाही, तर शुबमनने फावळ्या वेळेत आपल्या इतर उद्योगाकडे लक्ष दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र ही चर्चाच आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही.

इतकंच नाही, तर शुबमन कॅप्टन रोहितशी वाकडं घेतल्याचं म्हटलं जात आहे. शुबमनने रोहितला इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लटफॉर्मवर अनफॉलो केल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूणच रोहित-शुबमन या दोघांमध्ये नक्कीच काही तर खटके उडाले आहेत, अशी चर्चा आहे. आता ही केवळ चर्चा आहे की आणखी काही, मात्र याचा परिणाम टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेवर होऊ नये, अशी अपेक्षा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याची आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुबमन गिल, आवेश खान, खलील अहमद आणि रिंकू सिंह.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.