AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : साखळी फेरीतूनच दोन दिग्गज संघाचा पत्ता कापला, दुबळा समजला जाणारा संघ सुपर 8 फेरीत

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आहेत. सुपर आठ फेरीसाठी काही संघांचं जर तरचं गणित आहे. तर क गटाचं पूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे. या गटातून दिग्गज संघांचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते

T20 World Cup : साखळी फेरीतूनच दोन दिग्गज संघाचा पत्ता कापला, दुबळा समजला जाणारा संघ सुपर 8 फेरीत
| Updated on: Jun 14, 2024 | 3:53 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी एकूण 20 संघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चढाओढ सुरु होती. आता साखळी फेरीचं चित्र स्पष्ट होत असून जर तरची लढाई सुरु झाली आहे. अ गटातून भारताने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. तर दुसऱ्या संघासाठी अमेरिका, पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात चुरस आहे. तर आयर्लंडला संधी आहे पण मार्ग कठीण आहे. दुसरीकडे, ब गटातील लढाई रंगतदार वळणावर आली आहे. या गटातून ऑस्ट्रेलियाने पात्रता फेरी गाठली आहे. पण दुसऱ्या संघासाठी स्कॉटलँड आणि इंग्लंड यांच्यात चुरस आहे. ही लढाई इतक्या रंगतदार वळणावर आली आहे की काय होईल सांगता येत नाही. स्कॉटलँडचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना जिंकला तर स्कॉटलँड सुपर 8 फेरी गाठेल. जर हरला तर मात्र इंग्लंडला संधी मिळू शकते.

क गटाचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे. या गटातील प्रत्येक संघाचा एक एक सामना शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वीच दोन संघांनी सुपर 8 फेरी गाठली आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज या दोन संघांनी या गटातून पुढे कूच केली आहे. तर न्यूझीलंडसारख्या दिग्गज संघाचा पत्ता कापला गेला आहे. न्यूझीलंसोबत पापुआ न्यू गिनी आणि युगांडा हे देशही बाद झाले आहेत. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी 3 सामने जिंकत सुपर 8 फेरीत प्रवेश केला आहे.

ड गटातून दक्षिण अफ्रिकेने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. तर श्रीलंकेचं तीन सामन्यातच आव्हान संपुष्टात आलं आहे. या गटातून दुसऱ्या संघासाठी बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळ या संघात चुरस आहे. तसं पाहिलं तर बांगलादेशला सुपर 8 फेरीची सर्वाधिक संधी आहे. एकंदरीत सुपर 8 फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका या संघांनी धडक मारली आहे. तर उर्वरित तीन संघांबाबत उत्सुकता वाढली आहे. सुपर 8 फेरीचे सामने 19 जूनपासून सुरु होणार आहेत.  25 जूनपर्यंत हा थरार रंगेल. यातून चार संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत.

ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.