
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने उभे ठाकले आहे. अवघ्या काही तासात जेतेपदाचा मानकरी ठरणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल झाला आणि भारतीय क्रीडाप्रेमींच्या पदरी निराशा पडली. कारण नाणेफेकीचा कौल काही भारताच्या बाजूने लागला. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा होणं सहाजिकच आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर मिचेल सँटनर याने क्षणाचाही विलंब न करत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. यामुळे भारतीय गोलंदाजांवर धावा रोखण्याचं आव्हान असणार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर मिचेल सँटनर म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टी चांगली दिसत आहे आणि धावांचा पाठलाग करणं सोपं जाईल. भारतीय संघाला कमी धावांवर रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. संघ चांगला खेळत आहे आणि उपांत्य फेरीतील कामगिरीनंतर आत्मविश्वास दुणावला आहे. या सामन्यासाठी तयार आहोत.
कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीचा कौल गमवला असला तर निर्णय मात्र मनासारखा लागला आहे. कारण नाणेफेक जिंकली असती तरी प्रथम फलंदाजीच घेतली असती असं सूर्यकुमार यादव म्हणाला. सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं की, ‘आम्ही चांगली कामगिरी करत असल्याने प्रथम फलंदाजी करण्यास मिळाल्याने आनंद आहे. उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत धावा असणे नेहमीच चांगले असते. आता हा इतिहास आहे, नवीन विश्वचषक आहे आणि आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत.आशा आहे की आम्ही त्यांना चांगला खेळ दाखवू. त्याच संघासह मैदानात उतरू.’ या सामन्यापूर्वी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल केले जातील अशी चर्चा होती. पण त्यात काहीच बदल झालेला नाही. अभिषेक शर्मा आणि वरूण चक्रवर्ती या सामन्यात खेळणार आहेत.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना जिंकायचा असेल तर भारतीय संघाला 200 पार धावा करणं आवश्यक आहे. कारण ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. या खेळपट्टीवर 170-180 धावा आरामात गाठू शकतात. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर दुसऱ्या डावात दडपण येऊ शकते. त्यामुळे भारतीय फलंदाजांना चांगली सुरूवात करणं गरजेचं आहे. त्यामुळे धावगती वेगाने वाढेल. हा सामना 200 पार धावांचा झाला तरी इंग्लंडसारखी स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.