AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीचा बकरा करू नका… सावजी मटणाचा वाद पेटला, तुकाराम मुंढेंना चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनावलं

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या विधानाने नवी चर्चा सुरु होती. आता यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया देत चांगलंच सुनावले आहे.

बळीचा बकरा करू नका... सावजी मटणाचा वाद पेटला, तुकाराम मुंढेंना चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनावलं
चंद्रशेखर बावनकुळेImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 06, 2026 | 1:35 PM
Share

मांसाहार करणाऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बनवलेले मटण खाण्याची इच्छा असते. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागात बनवण्यात येणाऱ्या सावजी मटणाची चवच काही औरच आहे. मांसाहार करणारे हे मटण खाण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जातात. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद पेटला. त्यांनी मी हे मटण खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन असं विधान केले होते. आता त्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वक्तव्य केले आहे.

चंद्रेशखर बावनकुळे

नुकताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी तुकाराम मुंडे यांना चांगलेच सुनावले आहे. “सावजी हे रेस्टॉरंट विदर्भातील तीन चार पिढ्यांपासून सुरू आहे. सावजी ही मसल्याची पद्धती आहे. त्यामुळे प्रत्येकाला सावजी जेवलं पाहिजे अशी लोकप्रियता आहे. हे मसाले तसे आहेत. ते कुणी बनवत नाही. त्यावर सरसकट टिप्पणी करणं अधिकाऱ्याला योग्य दिसत नाही. जगातील अनेक देशात सावजीची मागणी केली जाते. मला वाटतं की त्या व्यवसायाबद्दल काही बोलू नये. त्यांच्या व्यवसायाला बळीचा बकरा करू नका. घरातील जेवण रेस्टॉरंटमध्ये आणलं जात आहे. मोठा व्यवसाय आहे. व्यवसाय बंद होईल असे आरोप करू नये” असे ते म्हणाले.

तुकाराम मुंडे नेमकं काय म्हणाले होते?

तुकाराम मुंढे यांनी अमरावतीत आल्यावर नागपुरी सावजी विषयी विधान केलं होतं. सावजी खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर सावजी (हलबा) समाजाने निषेध नोंदवला आहे. हलबा समाजाने आज रस्त्यावर उतरून तुकाराम मुंढे यांचा निषेध नोंदवला. त्यानंतर तुकाराम मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी अमरावती येथील कार्यक्रमात हे विधान केलं होतं. सावजी खाल्लं तर मी आजारी पडेन असं म्हटलं होतं. हे खरं आहे. पण, इतर कोणी खा किंवा खाऊ नका, असं मी म्हटलेलं नाही, असं तुकाराम मुंडे म्हणाले होते. आपल्या विधानावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दरम्यान, तुकाराम मुंढे यांचं हे विधान असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच त्याबाबतचे मिम्सही व्हायरल होत आहेत. तसेच तुकाराम मुंढे यांच्या या व्हिडिओवर अनेक पोस्ट येत आहेत. काही पोस्टमध्ये तर चला सावजी खाऊ असं म्हटलंय. त्यामुळे सोशल मीडियावर सावजी मटण हा ट्रेंड सुरू झाला आहे.

Follow Us
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला,
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत... महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय