‘विश्वचषक आणि संघाच्या वाटेत मी आडवा येणार नाही’; फॉर्मशी झगडणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य

एखादा खेळाडू फॉर्ममध्ये नसल्यास संघ व्यवस्थापन त्याला बाहेरचा रस्ता दाखवतं. पण एखादा खेळाडू ज्याने अनेक वर्ष संघाची सेवा केली असेल, अनेक शतकांसह अगदी दोन वर्षापूर्वीच विश्वचषक जिंकवून दिला असेल तर त्याला संघाबाहेर ठेवणं तसं अवघडंच.

'विश्वचषक आणि संघाच्या वाटेत मी आडवा येणार नाही'; फॉर्मशी झगडणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य
Eoin Morgan
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 11:31 AM

दुबई : अनेकदा एखादा खेळाडू फॉर्ममध्ये नसल्यास संघ व्यवस्थापन त्याला बाहेरचा रस्ता दाखवतं. पण एखादा खेळाडू ज्याने अनेक वर्ष संघाची सेवा केली असेल, अनेक शतकांसह अगदी दोन वर्षापूर्वीच विश्वचषक जिंकवून दिला असेल तर त्याला संघाबाहेर ठेवणं तसं अवघडंच. पण अशावेळी त्या खेळाडूने स्वत:चा फॉर्म पाहता स्वत:हून संघाबाहेर राहणं म्हणजे योग्य आणि मोठ्या मनाचा निर्णय म्हणावा लागेल. इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गनने (Eoin Morgan) असा निर्णय घेण्याची हिंमत दाखवली आहे. (T20 World Cup : England Captain Eoin Morgan Ready To Drop Himself from playing 11)

मॉर्गन म्हणाला की, “मी संघ आणि विश्वचषक यांच्यामध्ये येणार नाही, मी धावा करण्यात अपयशी ठरतोय पण मी एक चांगला कर्णधार आहे. संघाला गरज पडली तरी मी स्वतःला संघातून वगळू शकतो.” मॉर्गन म्हणाला, “जर मी वाईट फॉर्ममधून बाहेर आलो नसतो तर आज मी इथे उभा राहिलो नसतो. टी – 20 क्रिकेटमध्ये फलंदाजाला जोखीम घ्यावी लागते आणि मी तेच करतो. मी दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे.”

नुकताच भारत आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना पार पडला. ज्यामध्ये इंग्लंडता कर्णधार म्हणून मॉर्गनच्या जागी जोस बटलर याने संघाची धुरा सांभाळली. या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवत 7 विकेट्सनी दमदार विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात मॉर्गनने स्वत:ला बाहेर ठेवले असले तरी तो न्यूझीलंड विरुद्धच्या सराव सामन्यात मैदानात उतरणार आहे. पण विश्वचषकाच्या मुख्य सामन्यात काय करणार? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

…तर मी स्वतःला संघाबाहेर राहणं पसंत करेन

इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने स्काय स्पोर्ट्सशी बातचीत केली असताना त्याने सांगितलं, “स्वत:ला संघाबाहेर ठेवणं एक पर्याय आहे. मी संघाला टी-20 वर्ल्ड कप जिंकताना पाहू इच्छितो. त्यामुळे यामध्ये मी स्वत: संकट बनणार नाही. मी खराब फॉर्ममध्ये असलो तरी मी कर्णधारपद चांगलं भूषवू शकतो. पण माझा फॉर्म खराब असल्यास मी स्वत:ला नक्कीच संघाबाहेर करेन.”

आयपीएलमध्ये अपयशी

नुकत्याच झालेल्या आय़पीएलमध्ये मॉर्गन कर्णधार असलेला केकेआरचा संघ फायनलपर्यंत पोहोचला खरा. पण मॉर्गनने संपूर्ण स्पर्धेत 17 सामन्यात 11.08 च्या सरासरीने केवळ 133 धावांच केल्या. दरम्यान, मागील 7 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्येदेखील मॉर्गन अपयशी ठरला आहे. या 7 सामन्यांमध्ये त्याने 11.7 च्या सरासरीने केवळ 82 धावा केल्या आहेत.

इतर बातम्या

T20 World Cup मधील बांग्लादेशचं आव्हान कायम, ओमानवर 26 धावांनी विजय

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

T20 World Cup मध्ये स्कॉटलंडच्या खेळासह जर्सीही फॅन्सना आवडली, 12 वर्षांची चिमुरडी आहे डिझायनर

(T20 World Cup : England Captain Eoin Morgan Ready To Drop Himself from playing 11)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.