WTC Final मध्ये ‘या’ खेळाडूला खेळवणं भारताची चूक, माजी क्रिकेटपटूने केला मोठा दावा

इंग्लंडच्या साऊदम्पटनमध्ये पार पडलेल्या कसोटी क्रिकेटच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. संपूर्ण स्पर्धेत अनेक अप्रतिम विजय मिळवलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागल्याने सर्वंच भारतीय क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला.

WTC Final मध्ये 'या' खेळाडूला खेळवणं भारताची चूक, माजी क्रिकेटपटूने केला मोठा दावा
jadeja in team

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) सुरुवातीपासून भारतीय संघ उत्तम खेळ करत होता. दोन वर्षांत दर्जेदार खेळ दाखवून ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या संघाना पराभूत करुन भारतीय संघ WTC च्या अंतिम सामन्यात पोहोला होता. मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभूत झाला. या पराभवाचं खापर सर्वाधिक कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) फोडलं जात असतानाच भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी या पराभवाचं एक कारण अष्टपैलू रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) अंतिम सामन्यात खेळवलं गेलं हे आहे असा दावा केला आहे. (Taking Ravindra Jadeja In WTC Final as A batsman was Mistake says Sanjay Manjrekar)

सुरुवातीपासूनच भारतीय संघातून WTC Final च्या सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंना खेळवायचा याबद्दल बऱ्याच चर्चा केल्या जात होत्या. दोन फिरकीपटूंना खेळवायचं की चार वेगवान गोलंदाजाना हा  निर्णय होत नसल्याने सर्वच संघ व्यवस्थापन चिंतेत होतं. अखेर दोन फिरकीपटूंना खेळवण्यात आले. पण हीच भारताची चूक झाली असं संजय मांजरेकरांनी म्हटलं असून ते ईएसीपीएन-क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले, ”स्पीनरच्या निवडीवरुन वाद होताच. पण अशावेळी जाडेजाला स्पीनरच्या जागी एक फलंदाज म्हणून निवड करण भारताची चूकी होती. संघाने जाडेजाला एक फलंदाज म्हणून अधिक चांगली कामगिरी करेल यासाठी निवडलं पण त्याला काही खास कामगिरी करता न आल्याने मी आधीपासूनच या निर्णयाच्या विरोधात होतो.”

हनुमा विहारीला संधी दिली असती तर फरक पडला असता

या महत्त्वाच्या कसोटीसाठी विशेष कसोटीपटूंना संधी द्यायला हवी होती. असेही मांजरेकर म्हणाले. यावेळी हनुमा विहारीचं उदाहरण देत मांजरेकर म्हणाले, ‘विहारीला एक फलंदाज म्हणून संधी द्यायल गवी होती. विहारी सामन्यात असता तर कदाचित परिस्थिती काही वेगळी असली असती. कारण विहारीने आधीच्या सामन्यातून त्याचा डिफेन्स किती चांगला आहे हे दाखवलं आहे.’

इंग्लंड विरोधात चूक सुधारावी

जाडेजाने दोन्ही डावांत मिळून 31 रन केले. तर संपूर्ण सामन्यात केवळ 15.2 ओव्हर गोलंदाजी केली. ज्यात केवळ एकट विकेट मिळवला. असे असल्याने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने योग्यरित्या अंतिम 11 खेळाडू निवडणे गरजेचे असल्याचेही मांजरेकर म्हणाले.

हे ही वाचा :

“विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं क्रिकेटमधील अपराध ठरेल”

WTC Final मध्ये का पराभूत झाला भारतीय संघ?, सचिन तेंडुलकरने सांगितलं कुठे चूकला विराट कोहली

WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!

(Taking Ravindra Jadeja In WTC Final as A batsman was Mistake says Sanjay Manjrekar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI