AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसीचा मोठा ‘गेम’, टीम इंडिया अवघ्या अडीच तासात नंबर 1 वरुन दुसऱ्या स्थानी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने टीम इंडियाला मोठा झटका दिला आहे. टीम इंडियाने एका झटक्यात कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान गमावलं आहे.

आयसीसीचा मोठा 'गेम', टीम इंडिया अवघ्या अडीच तासात नंबर 1 वरुन दुसऱ्या स्थानी
| Updated on: Jan 17, 2023 | 5:51 PM
Share

मुंबई : टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला आज (17 जानेवारी) मोठा झटका बसला. पाठीच्या दुखापतीमुळे फलंदाज श्रेयस अय्यर याला एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी दिली. आयसीसीने आधी टीम इंडियाला नंबर 1 जाहीर केलं. मात्र त्यानंतर काही मिनिटांमध्येच टीम इंडिया दुसऱ्या स्थानी असल्याचं सांगितलं. त्यामुळे टीम इंडियाच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

आयसीसीने अवघ्या अडीच तासांमध्ये दुसऱ्यांदा कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. आयसीसीने आधी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी रँकिग प्रसिद्ध केली. त्यानुसार टीम इंडिया एक नंबर असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर आयसीसीने पुन्हा दुपारी 4 वाजता रँकिग जाहीर केली. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आली.

आयसीसीच्या या दुसऱ्या क्रमवारीनुसार, ऑस्ट्रेलिया 3 हजार 668 पॉइंट्स आणि 126 रेटिंग्ससह पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर टीम इंडिया 3 हजार 690 पॉइंट्स आणि 115 रेटिंग्ससह दुसऱ्या स्थानी आहे.

एका दिवसात 3 वेळा बदल

आयसीसीने दिवसभरात एकूण 3 वेळा टेस्ट रँकिग जाहीर केकली. सर्वात आधी सकाळी 8 वाजता. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया नंबर वन होती. त्यानंतर दुपारी दीड वाजता टीम इंडिया 3 हजार 690 पॉइंट्स आणि 115 रेटिंग्ससह पहिल्या स्थानी असल्याचं म्हटलं. तर ऑस्ट्रेलिया 3 हजार 231 पॉइंट्स आणि 111 रेटिंग्ससह दुसऱ्या स्थानी होती. यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा रँकिग प्रसिद्ध करण्यात आली. यात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळाला.

न्यूझीलंडला नुकसान

दरम्यान ताज्या क्रमवारीनुसार न्यूझीलंडला नुकसान झालं आहे. न्यूझीलंडला कसोटी क्रमवारीत एका स्थानाचं नुकसान झालं आहे. न्यूझीलंड आधी चौथ्या स्थानी होती. आता न्यूझीलंडची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. तर दक्षिण आफ्रिका 5 हजार 17 पॉइंट्स आणि 107 रेटिंग्ससह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर सातत्याने कसोटी मालिकेत पराभूत होत असल्याने पाकिस्तानची सहाव्या स्थानी घसरण झालीय.

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवार 18 जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा हैदराबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत ‘हिटमॅन’ रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.