Shivam Dube : 6 बॉल-6 सिक्स, शिवम दुबेचा 15 चेंडूत अर्धशतकी धमाका, न्यूझीलंडची धुलाई, पाहा व्हीडिओ
Shivam Dube Fifty IND vs NZ 4th T20i : शिवम दुबे याने विशाखापट्टणममध्ये न्यूझीलंड विरुद्ध विस्फोटक फलंदाजी करत धमाकेदार अर्धशतक झळकावलं. शिवमने यासह हार्दिकला मागे टाकलं. जाणून घ्या सविस्तर.

टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे याने न्यूझीलंड विरूद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात धमाका केला आहे. शिवमने विशाखापट्ट्णमधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना चाबूक अर्धशतक झळकावलं आहे. न्यूझीलंडने टीम इंडियासमोर 216 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना भारताची निराशाजनक सुरुवात झाली. अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे दोघे झटपट आऊट झाले. त्यानंतर संजू सॅमसन आणि रिंकु सिंह या दोघांनी भारताचा डाव चालवला. मात्र या दोघांना मोठी खेळी करता आली नाही.
संजू आणि रिंकुने तिसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. त्यानंतर संजू सॅमसन 24 धावांवर आऊट झाला. संजूनंतर रिंकु सिंह याने 39 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. हार्दिक पंड्या यानेही निराशा केली. हार्दिकने 2 धावा केल्या आणि आऊट झाला.
शिवमचा अर्धशतकी तडाखा
हार्दिक आऊट झाल्यानंतर शिवम दुबे सहाव्या स्थानी बॅटिंगसाठी आला. शिवमने मैदानात येताच हर्षित राणा याच्यासोबत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करायला सुरुवात केली. शिवमने चौफेर फटकेबाजी केली. जेकब डफी याने टाकलेल्या 13 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर शिवम दुबे याने सिक्स खेचला. शिवमने यासह अवघ्या 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. शिवमने 346.67 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. शिवमने या विस्फोटक अर्धशतकी खेळीत 6 षटकार आणि 2 चौकार लगावले.
शिवम तिसरा भारतीय, हार्दिक पंड्या याला पछाडलं
शिवमने 15 चेंडूत अर्धशतक करत खास यादीत स्थान मिळवलं. शिवम टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. शिवमने यासह हार्दिक पंड्याला मागे टाकलं. हार्दिकने 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान शतक करण्याचा विक्रम हा माजी फलंदाज युवराज सिंह याच्या नावावर आहे. तर या यादीत अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. अभिषेकने याच मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक लगावलं होतं.
शिवमकडून न्यूझीलंडची धुलाई
6⃣5⃣ off just 23 deliveries 👌👌
End of a blistering knock from Shivam Dube 👏👏
Updates ▶️ https://t.co/GVkrQKKyd6 #TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/L1FKjze4VI
— BCCI (@BCCI) January 28, 2026
भारतासाठी वेगवान टी 20i अर्धशतक करणारे फलंदाज
युवराज सिंह, विरुद्ध इंग्लंड, 12 चेंडू, 2007
अभिषेक शर्मा, विरुद्ध न्यूझीलंड, 14 चेंडू, 2026
शिवम दुबे, विरुद्ध न्यूझीलंड, 15 चेंडू, 2026
हार्दिक पंड्या, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 16 चेंडू, 2025
