IND vs SL : दीपक हुड्डाकडून सामन्यादरम्यान शिवीगाळ? व्हीडिओ व्हायरल

Deepak Hudda Abused : दीपक हुड्डाने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात नाबाद 41 धावांची खेळी केली.

IND vs SL : दीपक हुड्डाकडून सामन्यादरम्यान शिवीगाळ? व्हीडिओ व्हायरल
Deepak HuddaImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 5:04 PM

मुंबई : टीम इंडियाने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात (IND vs SL) शेवटच्या बॉलवर थरारक विजय मिळवला. टीम इंडियाने (Team India) या विजयासह नववर्षाची विजयी सुरुवात केली. सोबतच 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. शिवम मावी, अक्षर पटेल आणि दीपक हुड्डा या तिकडीने टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. आपल्या टी 20 डेब्यूत शिवम मावीने 4 विकेट्स घेतल्या. तर त्याआधी अडचणीत असताना हुड्डा आणि अक्षर या जोडीने निर्णायक क्षणी जोरदार फटकेबाजी करत श्रीलंकेसमोर 163 धावांचं लक्ष्य ठेवलं. या दरम्यान दीपकने (Deepak Hudda) अंपायरला शिवागाळ केल्याचा दावा करणारा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (team india batter deepak hudda abused to umpire due to deny wide ball against to sri lanka 1st t 20i at wankhede stadium mumbai)

नक्की काय झालं?

हा सर्व प्रकार टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यानच्या 18 व्या ओव्हरमधील 5 व्या बॉलवर घडला. हुड्डा ऑन फिल्ड अंपायरवर संतापला. श्रीलंकेकडून कसून राजिथा बॉलिंग टाकत होता. कसूनने 5 वा बॉल टाकला. तोच बॉल हुड्डाने वाईड समजून सोडून दिला. त्यानंतर अंपायर वाईड बॉलचा इशारा करेल, या अपेक्षेने हुडडाने फिल्ड अंपायरकडे पाहिलं. मात्र अंपायरने वाईड बॉल दिला नाही. त्यानंतर हुड्डाचा पार चढला. हुड्डाला राग अनावर झाला. त्याने अंपायरला शिव्याच घातल्या. आता हुड्डाचा हा व्हीडिओ व्हायरल होतोय. आता अंपायरसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणात हुड्डाविरोधात कारवाई होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

हे सुद्धा वाचा

दीपक हुड्डाकडून शिवीगाळ?

मालिकेत 1-0 ने आघाडी

दरम्यान टीम इंडियाने नववर्षाची विजयी सलामी केल्याने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ची स्थिती आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेला विजय आवश्यक असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्याडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.