AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karun Nair : करुण नायर इंग्लंड विरुद्ध अपयशी, चारही डावांत ढेर, आता पत्ता कट होणार?

Karun Nair vs England 2nd Test : करुण नायर याच्याकडून भारतीय क्रिकेट चाहत्यांना इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र करुण पहिल्या 2 सामन्यांमध्ये तशी कामगिरी करु शकला नाही.

Karun Nair : करुण नायर इंग्लंड विरुद्ध अपयशी, चारही डावांत ढेर, आता पत्ता कट होणार?
Karun Nair Team IndiaImage Credit source: Steve Bardens/Getty Images
| Updated on: Jul 06, 2025 | 8:21 PM
Share

भारतीय कसोटी क्रिकेट संघाला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. मात्र भारतीय फलंदाजांची उल्लेखनीय कामगिरी ही जमेची बाजू ठरली. भारतीय फलंदाजांनी दुसर्‍या सामन्यातही धावांचा पाऊस पाडला. मात्र भारतासाठी कसोटीत त्रिशतक करणारा करुण नायर स्वप्नवत कमबॅक करण्यात अपयशी ठरला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कडक कामगिरीच्या जोरावर निवड समितीने करुण नायरची इंग्लंड विरुद्धचा कसोटी मालिकेत निवड केली. मात्र करुणला पहिल्या 2 कसोटीतील 4 डावांत काही खास करता आलं नाही. त्यामुळे करुणच्या कसोटी कारकीर्दीतील इंग्लंड विरुद्धची मालिका शेवटची ठरणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

करुण नायरने देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या. करुणने यासह निवड समितीला कमबॅकची संधी देण्यास भाग पाडलं. करुणचं तब्बल 8 वर्षांनंतर कमबॅक झालं. त्यामुळे करुण देशांतर्गत क्रिकेटप्रमाणे इंग्लंड विरुद्धही तशाच धावा करेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना होती. करुणला या 2 सामन्यांमधील काही डावात सुरुवात मिळाली. मात्र करुण मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे करुणला तिसऱ्या सामन्यातून डच्चू दिला जाऊ शकतो.

करुणला इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या स्थानी संधी मिळाली. साई सुदर्शनला दुसऱ्या सामन्यातून वगळण्यात आल्यानं करुणला तिसऱ्या स्थानी फलंदाजांसाठी यावं लागलं. करुण या संधीचा फायदा घेण्यात अपयशी ठरला. करुण 31 धावांवर आऊट झाला. तर करुणने दुसऱ्या डावातही निराशा केली. करुणने दुसऱ्या डावात 26 धावा केल्या. करुणला दोन्ही डावात चांगली सुरुवात मिळाली. मात्र करुण त्या खेळीला मोठ्या धावसंख्येत परावर्तीत करु शकला नाही.

8 वर्षांनी कमबॅक

करुण नायरने 2016 साली इंग्लंड विरुद्ध त्रिशतक ठोकलं होतं. मात्र त्यानंतर करुणला फार संधी मिळाली नाही. मात्र करुण आता संधी मिळाल्यानंतर निवड समितीला प्रभावित करण्यात यशस्वी होऊ शकला नाही. करुणने 2 सामन्यांमधील 4 डावांत 19.25 च्या सरासरीने 77 धावा केल्या. तर करुणची 31 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

टीम मॅनजमेंटच्या भूमिकेकडे लक्ष

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 10 जुलैपासून लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम मॅनजेमंट करुणला तिसऱ्या सामन्यात संधी देण्याबाबत काय निर्णय घेते? हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे करुणला आणखी संधी द्यायची की त्याच्या जागी दुसऱ्या फलंदाजाचा समावेश करायचा? याबाबत टीम मॅनेजमेंटकडून काय निर्णय घेतला जातो? हे लवकरच स्पष्ट होईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.