IND VS BAN 2nd Test : रोहित शर्माने LIVE मॅचमध्ये कॅमेरामनला दिल्या शिव्या, नेमकं काय घडलं?

IND VS BAN 2nd Test : बांग्लादेश विरुद्ध टीम इंडियाचा कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. यावेळी कॅप्टन रोहित शर्माची एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. रोहित शर्मा अनेकदा त्याच्या वर्तनामुळे ट्रोल होतो. आता मैदानात काय घडलय? ते जाणून घ्या.

IND VS BAN 2nd Test : रोहित शर्माने LIVE मॅचमध्ये कॅमेरामनला दिल्या शिव्या, नेमकं काय घडलं?
Rohit Sharma
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 1:46 PM

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आपल्या फलंदाजीसाठी ओळखला जातोच. पण काहीवेळा मैदानातील ठराविक गोष्टींमुळे तो चर्चेत असतो. रोहित शर्माने कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी असच काहीतरी केलं. रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये काहीतरी बोलत होता. त्यावेळी अचानक त्याने कॅमेरामनला शिव्या द्यायला सुरुवात केली. रोहितने असं का केलं? त्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या. भारताच्या पहिल्या इनिंग दरम्यान रोहित शर्मा आणि ऋषभ पंत पॅव्हेलियनमध्ये बसले होते. रोहित शर्मा विकेटकीपर पंतसोबत काहीतरी बोलत होता. हेड कोच गौतम गंभीर शेजारी बसले होते.

रोहित शर्मा पंतसोबत बोलत होता. त्याचवेळी त्याला समजलं की, कॅमेरामनने कॅमेरा त्याच्यावर फोकस केला आहे. त्यावेळी रोहितने पंतबरोबर बोलण बंद करुन कॅमेरामनला मॅच दाखवण्याचा इशारा केला. रोहित शर्मा यावेळी मैदानावर जे बोलते, तसे काही शब्द बडबडला. रोहितला असं करताना पाहून पंतला हसायला आलं, गौतम गंभीरही स्वत:वर कंट्रोल करु शकला नाही.

भारतीय गोलंदाजांची कमाल

रोहित शर्मा अनेकदा मैदानावर अपशब्द उच्चारतो. तो आपल्या खेळाडूंना शिव्या देतो. मी हे सर्व मनापासून बोलत नाही, असं तो अनेकदा बोललाय. मैदानाबाहेर गेल्यावर तो हे सर्व विसरुन जातो. कानपूर कसोटीत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. मात्र, तरीही टीम इंडिया विजयाच्या जवळ आहे. टीम इंडियाने पहिला डाव 285 धावांवर घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. बांग्लादेशच्या टीमला 146 रन्सवर ऑलआऊट केलं. कानपूर कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला आता 95 धावांची आवश्यकता आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....